तुळजापूर तालुक्यातील काटी या गावातील मोहन शिंदे या शेतकऱ्याने केवळ सव्वा एकर क्षेत्रावर केलेली तुरीची लागवड थक्क करणारी आहे. पारंपरिक पद्धतीने दर वर्षी शेती करणारा हा चार एकर शेतीचा मालक यंदा सव्वा एकर तुरीच्या क्षेत्रातून भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.

शेतीतला नफा वाढवायचा असेल तर सुधारित व्यवस्थापनाला प्राधान्य द्यायलाच हवे. ग्रामीण भागातील अनेक छोटे छोटे शेतकरी शक्कल लढवून अफलातून प्रयोग सध्या करीत आहेत. दुष्काळी पाश्र्वभूमीवर शेती व्यवसाय आणि कुटुंबाचा चरितार्थ तगला पाहिजे, यासाठी सुरू असलेली ही धडपड दखलपात्र आहे. तुळजापूर तालुक्यातील काटी या गावातील मोहन चंद्रहारी शिंदे या शेतकऱ्याने केवळ सव्वा एकर क्षेत्रावर केलेली तुरीची लागवड थक्क करणारी आहे. पारंपरिक पद्धतीने दर वर्षी शेती करणारा हा चार एकर शेतीचा मालक यंदा सव्वा एकर तुरीच्या क्षेत्रातून भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. मोहन शिंदे यांची तूर परिसरातील अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. बारा फूट उंच असलेले तुरीचे झाड आणि एका झाडाला लगडलेल्या दीड हजारांहून अधिक शेंगा आता अनेक कृषी पर्यटक आणि अभ्यासकांच्या कुतूहलाचा विषय आहे.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
abhay daga upsc marathi news, abhay daga upsc latest marathi news
“नव्या स्वरूपातील गुन्हे सोडविण्याचे आव्हान झेलणारा पोलीस अधिकारी होणार”, सनदी सेवेत निवडप्राप्त अभय डागाची मनिषा
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती

तूर म्हटले की, कीड आली. या किडीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सामान्य शेतकऱ्याला जिवाचे रान करावे लागते. तुरीवर प्रामुख्याने शेंगामाशी, शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, तूर कळी अवस्थेत असताना किडींच्या नियंत्रणासाठी कीडनाशक, निंबोळी अर्क अत्यंत आवश्यक. दव पडल्यामुळे बुरशीजन्य रोगाची लागण होण्याची मोठी भीती असते. त्यासाठी बुरशीनाशक फवारणी आवश्यक ठरते. किडीला वेळीच रोखण्यासाठी शेतात पक्षीथांबे उभारले जातात. त्यासाठी तुरीमध्ये पिवळ्या ज्वारीची लागवडसुद्धा केली जाते. एकात्मिक कीड व्यवस्थापन हा जरी कागदावरचा विषय

असला तरी या महत्त्वाच्या व्यवस्थापनातून शिंदे यांना मोठे लाभ झाले आहेत. पहिल्यांदाच त्यांनी अभिनव प्रकारे तूर घेण्याचा निर्णय घेतला. सव्वा एकर क्षेत्रात तुरीचे अक्षरश: जंगल निर्माण झाले आहे. तूर झाडाखाली गेलेला व्यक्ती दिसतही नाही.

काटी गावात राहणाऱ्या मोहन शिंदे यांचे दोन मुली, एक मुलगा, आई आणि पत्नी, असे सहा जणांचे कुटुंब आहे. पदरात चार एकर जमीन आणि सहा जणांच्या चरितार्थाचा गाडा ही खरी तर कसरत. मात्र मोहन शिंदे कष्टाच्या जोरावर ही कसरत आजवर करीत आले आहेत. मागच्या वर्षी त्यांनी मिरचीचे मोठे पीक घेतले होते. मात्र नेहमीप्रमाणे मिरची हातात आली आणि बाजारातील भाव कोसळले. रात्रंदिवस केलेल्या कष्टाला बाजाराने मातीमोल ठरवले. त्यामुळे यंदा मिरचीऐवजी तुरीची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तूर लागवड करताना चार फुटांवर बियाणे टाकले. त्यातील एक बियाणे सोडून दिले. त्यामुळे आठ फूट अंतरावर एका झाडाची लागवड झाली. परिणामी झाडाला वाढ होण्यासाठी भरपूर जागा मिळाली. तरारून झाड आभाळाच्या दिशेने झेपावले आणि बघता बघता सहा महिन्यांत तुरीच्या झाडाने बारा फुटांची उंची केव्हा गाठली हे लक्षातदेखील

आले नाही. गावात अनेकांनी तूर लागवड केली आहे. मात्र शिंदे यांच्या तुरीच्या तुलनेत अन्य शेतकऱ्यांच्या झाडाची संख्या, उंची आणि

शेंगांचे प्रमाण नगण्य आहे. बारा फूट उंच असलेल्या एका तुरीच्या झाडाला दीड हजारांहून अधिक शेंगा सध्या लगडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरीही शेती पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.

झाडाची उंची चक्क बारा फूट, झाडाला लागलेल्या शेंगांची संख्या विचाराल तर एका झाडाला दीड ते दोन हजार शेंगांच्या ओझ्याने झाडाच्या फांद्या जमिनीकडे झुकल्या आहेत. लगडलेल्या शेंगांमुळे झाडाची पानेसुद्धा झाकोळून गेली आहेत. उत्कृष्ट व्यवस्थापन आणि अभ्यासाच्या जोरावर सव्वा एकर क्षेत्रातून तब्बल २० ते २२ क्विंटल उत्पन्न मिळेल, असा विश्वासि शिंदे यांना आहे. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीदेखील शिंदे यांची तूर पाहून आश्चर्य व्यक्त करीत आहेत. कृषी विभागाचे अधिकारी व निमल सिड्सचे सेल्स ऑफिसर शिवाजी भोसले, भारत वाघमारे यांनी तूर पिकाची नुकतीच पाहणी केली. शिंदे यांनी यंदा पाऊसकाळ चांगला झाल्याने निमल शेडच्या तांबडय़ा तुरीची लागवड केली. सध्या तुरीचे पीक चांगलेच बहरले असून तुरीला फुले लागण्यापूर्वी त्यांनी तीन वेळेस छाटणी करून घेतली. सध्या शेतात साधारण बारा फूट उंचीची तूर आहे. एकसारखी छाटणी करण्यात आल्याने शेतातील हे सौंदर्य टिपण्यासाठी अनेक जण त्यांच्या शेताला भेट देत आहेत. आपल्या चार एकर शेतात प्रामाणिकपणे कष्ट करून हातात येईल ते उत्पन्न घेण्याकडे त्यांचा कल आहे. िशदे यांनी चाळीस हजार रुपये खर्च करून ठिबक सिंचनाची सोय करून घेतली. पूर्वी पारंपरिक पद्धतीने कापूस आणि सोयाबीनसारखी पिके घेतली जात. बऱ्याचदा मर्यादित पाण्यामुळे उत्पन्न कमी यायचे. ठिबक सिंचनाची सोय करून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी त्यांनी यंदा सव्वा एकरात तुरीची लागवड केली. पारंपरिक पीक पद्धतीला अनुभवाची जोड देऊन केलेल्या बदलामुळे शिंदे यांचे शेत बहरले आहे. पुढच्या हंगामात नगदी पिकांकडे अधिक लक्ष देण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. त्यांनी तुरीच्या लागवडीसाठी केलेले व्यवस्थापन जिल्हय़ातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.

दुष्काळात ठिबकचा मोठा आधार

सलग चार वष्रे उस्मानाबाद जिल्ह्य़ात दुष्काळ मुक्काम ठोकून होता. त्यामुळे पिकाची नासाडी आणि कर्जाचा डोंगर हे वास्तव जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले. अशा परिस्थितीत मोहन शिंदे यांनी खचून न जाता चाळीस हजार रुपये खर्चून ठिबक सिंचन करण्याचा निर्णय घेतला. अनेकांच्या आकर्षणाचा आणि अभ्यासाचा विषय ठरलेली तूर त्यांनी ठिबकच्या पाण्यावर जोपासली आहे. चाळीस गुंठय़ाहून अधिक क्षेत्रातील तूर सुमारे अडीच टनापर्यंत उतारा देऊन जाईल, असा त्यांना विश्वास आहे. मात्र मागील हंगामात असलेला तुरीचा भाव यंदा नाही. प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांपर्यंत भाव नक्की आपल्या पदरात पडेल, अशी त्यांना आशा आहे. चाळीस गुंठय़ांहून उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या मदतीने ठिबकच्या पाण्यावर अडीच टन तुरीचे उत्पन्न घेणारा हा जिल्ह्य़ातील कदाचित एकमेव शेतकरी असेल. श्रम, पाण्याचे व्यवस्थापन, शेतीच्या कामात कुटुंबाचा सहवास आणि आपल्या शेतीविषयक ज्ञानाच्या अनुभवातून शिंदे यांनी केलेला हा प्रयोग अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऊस या पिकाऐवजी वेगळा सक्षम पर्याय देणारा आहे. सव्वा एकरातून सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत योग्य नियोजनामुळे मिळू शकते. याचे जिवंत उदाहरण शिंदे यांनी घालून दिले आहे.

रवींद्र केसकर ravindra.keskar@rediffmail.com