सर्वाधिक आयुष्यमान असलेले चिंचेचे झाड शेतकऱ्याला आर्थिकदृष्टय़ा अतिशय चांगले उत्पन्न देते. १५० वर्षांपेक्षा अधिक आयुष्यमान असलेली जुने झाडे आजही महाराष्ट्रभर पाहायला मिळतात. लातूर तालुक्यातील एकुरगा गावात अतिशय दर्जेदार चिंचेचे झाड असून या झाडाच्या फोडलेल्या चिंचेला या वर्षी बाजारपेठेत तब्बल २३ हजार ७०० रुपये क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला आहे. या वर्षी या झाडाला दीड क्विंटल फोडलेली चिंच निघाली. म्हणजे या झाडाने ४० हजार रुपयांचे उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळवून दिले. अवर्षणप्रवण किंवा कोरडवाहू विभागासाठी वरदान असलेले चिंचेचे झाड सदाहरित, कणखर, रोग-किडीस अतिशय कमी प्रादुर्भाव असलेले आहे. कोणत्याही हवामानात व जमिनीत वाढणारे हे शतायुषी फळ-पीक आहे.

शेतात हंगामी पिकाबरोबर आंबा, चिंच, जांभूळ, पेरू अशी फळझाडे लावण्याची पूर्वापार पद्धत होती. शेतीमालाबरोबरच कुटुंबाला आवश्यक असणारी सर्व फळे घरच्या घरी उपलब्ध व्हावीत व पिढय़ान्पिढय़ा त्या फळांचा लाभ घेता यावा हा उद्देश होता. सर्वाधिक आयुष्यमान असलेले चिंचेचे झाड शेतकऱ्याला आर्थिकदृष्टय़ा अतिशय चांगले उत्पन्न देते. १५० वर्षांपेक्षा अधिक आयुष्यमान असलेली जुनी झाडे आजही महाराष्ट्रभर पाहायला मिळतात. लातूर तालुक्यातील एकुरगा गावात अतिशय दर्जेदार चिंचेचे झाड असून या झाडाच्या फोडलेल्या चिंचेला या वर्षी बाजारपेठेत तब्बल २३ हजार ७०० रुपये क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला आहे. या वर्षी या झाडाला दीड क्विंटल फोडलेली चिंच निघाली. म्हणजे या झाडाने ४० हजार रुपयांचे उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळवून दिले.
अवर्षणप्रवण किंवा कोरडवाहू विभागासाठी वरदान असलेले चिंचेचे झाड सदाहरित, कणखर, रोग-किडीस अतिशय कमी प्रादुर्भाव असलेले आहे. कोणत्याही हवामानात व जमिनीत वाढणारे हे शतायुषी फळ-पीक आहे. चिंचेचे उगमस्थान पूर्व आफ्रिका असून इजिप्त आणि ग्रीकमध्ये या फळ-पिकाची ओळख चौथ्या शतकापासून होती. अतिप्राचीन ग्रंथात चिंचेचा उल्लेख आहे. भारतात चिंचेला खजुराचा मान आहे. चिंचेचा प्रसार इजिप्त, सुदान, तवान, मलेशिया, थायलँड, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, कॅलिफोíनया व भारतात मोठय़ा प्रमाणात आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या मसाले पिकात चिंचेचा सहावा क्रमांक आहे. चिंच खाण्यासाठी अखंड, सोललेली, फोडलेली, चिंचगर, चिंचोक्यापासून तयार केलेली पावडर, चिंचेची पेस्ट असे अनेक उपपदार्थ निर्यात होतात. वाळलेल्या चिंचेचा वाटा निर्यातीत ५० टक्के आहे. सुमारे ६० देशांत चिंच व उपपदार्थाची निर्यात होते.
अन्नपदार्थ चविष्ट बनवण्यासाठी व रुची वाढवण्यासाठी चिंचेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चिंचोक्याचा वापर सुपारीप्रमाणे खाण्यासाठी, कुंकू तयार करण्यासाठी, स्टार्च निर्मितीसाठी केला जातो म्हणूनच चिंचेला कल्पवृक्ष म्हटले जाते. शेती औजारे तयार करण्यासाठी चिंचेच्या लाकडाचा प्रामुख्याने वापर केला जातो. झाडाच्या पानगळी व फुलगळीपासून जमिनीला सेंद्रिय पदार्थ मिळतात व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. चिंच ही पचनक्रियेस योग्य असून मलसारक आहे. भूक वाढवण्यासाठी मदत करते. कर्करोग नियंत्रणात चिंचेचा मोठा वाटा आहे. चिंच ही वात आणि पित्तशामक आहे. चिंचेला आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे.
आपल्या देशात चिंचेचा वापर हा पूर्वापार आहे. दक्षिण भारतात चिंचेच्या वापराचे प्रमाण अतिशय मोठे आहे. प्रत्येक खाद्यपदार्थात चिंच हा अविभाज्य घटक आहे. तेथील हवामानानुसार चिंच आवश्यक आहे. तेथील नागरिकांना चिंच खाण्याचे विविध फायदे होतात. मात्र त्यामानाने उत्तर भारतात चिंच खाण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. महाराष्ट्रात नगर, नाशिक, लातूर, बार्शी, सोलापूर या बाजारपेठेत चिंचेची प्रचंड आवक असते. या वर्षी चिंचेची लागवड कमी झाल्यामुळे ३० टक्के उत्पादनात घट झाली आहे, मात्र चिंचेचे भाव गतवर्षीच्या दीडपट आहेत. लातूर बाजारपेठेत बिनफोडलेल्या चिंचेला २५० ते ३ हजार रुपये क्िंवटल असा भाव असून फोडलेल्या चिंचेचे भाव ७ हजार ५०० ते १० हजार रुपये क्विंटलपर्यंत आहेत.
महाराष्ट्रात या वर्षीची चिंचेची उलाढाल ५ हजार कोटींपेक्षा अधिक आहे. नगर, बार्शी या बाजारपेठेत बाजार समिती चिंचेच्या उत्पादकांची गरसोय होणार नाही याची काळजी घेते. या वाणाला बाजारपेठेत वेगळा मान दिला जातो व व्यापारावर देखरेख केली जाते. राज्यात नगर बाजारपेठेचा पहिला क्रमांक असून दुसरा क्रमांक बार्शी तर तिसरा क्रमांक लातूरचा आहे. लातूर बाजारपेठेत गेल्या दोन महिन्यांपासून दररोज ४०० क्िंवटलपेक्षा अधिक आवक आहे. बाजार समिती क्िंवटलला ६० ते ७० रुपये कर आकारते. चिंचोक्यावर १५ रुपये, शिवाय कडता ४ रुपये किलो घेतला जातो. उत्पादकांकडे कुठलेही लक्ष दिले जात नसल्याची तक्रार फक्रुद्दीन पटेल या व्यापाऱ्याने केली आहे.
बाजारपेठेत चिंचेच्या व्यापाऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या तर देशी बाजारपेठेबरोबरच दुबई, थायलँड, सिंगापूर, इजिप्त, ऑस्ट्रेलिया या बाजारपेठेतही भारतीय चिंचेला अधिक किंमत मिळवून देता येणे शक्य आहे. बाजारपेठेतील निर्यात तंत्रज्ञान अवगत करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. शासकीय स्तरावरून यासाठी विशेष उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. गूळ विक्रेत्यांसाठी जसे मोठे सेल हॉल उभे केले जातात तिच सुविधा चिंच विक्रेत्यांसाठी उपलब्ध केली पाहिजे. बाजारपेठेतील चिंचेची साफसफाई करून त्यासाठी महिला बचतगटांना कामाची संधी देऊन चिंच पॅकिंग करून इतर धान्यांप्रमाणे विकण्याची व्यवस्था केली पाहिजे. बाजार समित्या व पणन महामंडळातर्फे बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन सोयी उपलब्ध केल्या पाहिजेत. सध्या बाजारपेठेत आलेली चिंच पायाने तुडवून पोत्यात भरली जाते व ती तशीच विकली जाते. यामुळे देशी बाजारपेठेत ती विकली जात असली तरी असा माल निर्यात करता येत नाही.
चिंचेचे किमान ४०० प्रकार असून पहिली दहा-बारा वष्रे या झाडाची निगा राखल्यास त्यानंतर दर वर्षी एका झाडाला सरासरी २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. काही प्रमाणात शेतकऱ्यांनी केवळ चिंचेची शेती केली असून जे भांडवल गुंतवू शकतात अशा शेतकऱ्यांना याचा दीर्घकाळ लाभ मिळतो. दहा-बारा वर्षांनंतर या झाडाची पुन्हा फारशी निगा राखण्याची गरज नाही. २६३, प्रतिष्ठान, योगेश्वरी असे सुधारित वाण मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत विकसित करण्यात आले आहेत. जुन्या झाडांवर नवीन चांगल्या वाणाचे कलम करता येते. कलम केल्यामुळे कमी कालावधीत झाडाला फळे येतात. लांब आकार, लाल रंग असणाऱ्या चिंचेला बाजारपेठेत चांगला भाव आहे. मोठय़ा व चांगल्या मालात छापन, करीफुल असे नामाभिदान वापरले जाते. खेडोपाडी चिंचा पाडण्याचे काम बागवान मंडळी करतात व घरोघरी चिंचा फोडण्याच्या कामात अनेक जणांना रोजगार मिळतो. चार महिन्यांच्या उन्हाळी कामात किमान ४ ते ५ लाख लोकांना हा रोजगार उपलब्ध होतो. फोडलेल्या चिंचा तातडीने बाजारपेठेत विकण्याची पद्धत आता इतिहासजमा झाली असून इतर मालाप्रमाणेच शीतगृहात चिंचा ठेवल्या जातात व जेव्हा भाव मिळतो तेव्हा त्या विकल्या जातात. अर्थात याचा लाभ शेतकऱ्यांना न मिळता जी मंडळी भांडवल गुंतवून व्यवसाय करतात त्यांनाच अधिक होतो. राहुरी, मराठवाडा येथील कृषी विद्यापीठात अत्याधुनिक चिंचेचे संशोधन झाले आहे. नव्या संशोधित वाणात झाडाचा आकार छोटा राहील त्यामुळे झाडाची निगा राखणे सोपे होईल अशी पद्धत विकसित झाली आहे. शेतकऱ्याच्या मागणीनुसार चिंचेच्या वाणामध्ये नवे संशोधन झाले पाहिजे. देशाची गरज भागवून विदेशात अधिकाधिक चिंच निर्यातीचा दृष्टिकोन समोर ठेवून काम करण्याची गरज आहे.

Finance Ministry report predicts a comforting dip in inflation amid forecasted monsoon rains
महागाईत दिलासादायी उताराचा अंदाज; मोसमी पावसाच्या अनुमानाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाचा अहवाल
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

गरज संशोधनाची..
राज्याची सध्याची चिंच उत्पादन क्षमता किमान दसपट वाढवता येऊ शकते मात्र त्यासाठी योग्य नियोजन केले गेले पाहिजे. वडिलांनी लावलेल्या झाडांचे संगोपन पुढची पिढी करत असली तरी नव्याने चिंचेची लागवड करण्याचे प्रमाण कमी आहे. राज्यात पडीक शेतीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर असून त्यावर चिंचेची लागवड केल्यास कमी पाण्यावर अधिक उत्पादन घेता येऊ शकते. चिंचेचे विक्री तंत्रज्ञान, उत्पादन यात काळानुरूप बदल व्हायला हवा. कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाहिजे. आंब्याचा मोहोर गळून पडू नये यासाठी संशोधन झाले आहे व त्यावर विविध फवारण्या घेतल्या जातात मात्र चिंचेचा मोहोर गळू नये यासाठी कोणत्या फवारण्या केल्या पाहिजेत याबद्दल फारसे संशोधन झाले नाही. हे संशोधन झाले तर मोहोर टिकेल व चिंचेचे अधिक उत्पादन होईल. भुईमुगाच्या शेंगा फोडण्यासाठी मनुष्यबळावर अवलंबून न राहता यांत्रिक पद्धत निर्माण झाली त्याच पद्धतीने आगामी काळात चिंचा फोडण्याचे यंत्रही विकसित होण्याची गरज आहे.
प्रदीप नणंदकर pradeepnanandkar@gmail.com