चंदनाला जितकी मागणी आहे त्या तुलनेत उपलब्धतेचे प्रमाण खूप कमी आहे. जागतिक बाजारात चंदनाची मागणी सातत्याने वाढत आहे. कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांत चंदनाचे सर्वाधिक उत्पादन होते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांतील चंदनाचे क्षेत्र वाढीस लागले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही चंदनाने मूळ धरले आहे. विशेषत: महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ अन्वये चंदनाच्या तोडीस बंधन घातले गेले आहे. चंदन चोरीची भीती असल्याने आजवर शेतकरी यापासून दूर राहिला होता. तसेच कायद्याच्या अडचणीही जाचक बनल्या होत्या. अलीकडे केंद्र व राज्य शासनानेही चंदन लागवडीस प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे.
चंदनाचा सुगंध मोहीत करणारा. त्यापासून बनविलेले काष्ठशिल्पही सर्वानाच भुरळ घालणारे. औषधी गुणधर्मही तितकेच मोलाचे. असे हे चंदनाचे झाड बळीराजालाही लखपती नव्हे तर कोटय़धीश बनविणारे. सांप्रतकाळी महाराष्ट्र देशी दुष्काळ झळा बसू लागल्या आहेत. जलसमृद्ध म्हणविल्या जाणाऱ्या पश्चिमेकडील जिल्ह्य़ातही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. अशा स्थितीत चंदनाची शेती ही शेतकऱ्यांना समृद्ध बनविणारी आहे.
चंदनाची महती भारतीयांना अनेक वर्षांपासून आहे. प्राचीन काळातील लेखामध्ये चंदन वृक्षाची महती पाहावयास मिळते. चंदनाची जितकी मागणी आहे त्या तुलनेत उपलब्धतेचे प्रमाण खूप कमी आहे. जागतिक बाजारात चंदनाची मागणी सातत्याने वाढत आहे. कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांत चंदनाचे सर्वाधिक उत्पादन होते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांतील चंदनाचे क्षेत्र वाढीस लागले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही चंदनाने मूळ धरले आहे. विशेषत: महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ अन्वये चंदनाच्या तोडीस बंधन घातले गेले आहे. चंदन चोरीची भीती असल्याने आजवर शेतकरी यापासून दूर राहिला होता. तसेच कायद्याच्या अडचणीही जाचक बनल्या होत्या. अलीकडे केंद्र व राज्य शासनानेही चंदन लागवडीस प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या सर्वच भागांमध्ये चंदन लागवड लक्षणीय प्रमाणामध्ये वाढू लागली आहे.
चंदनाची रोपवाटिका पूर्वी कर्नाटकात प्रामुख्याने असायची. आता महाराष्ट्रातही अशा रोपवाटिका सुरू झाल्या आहेत. हरितमित्र परिवाराने या कामी पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे अध्यक्ष, चंदनमित्र मिहद्र घागरे यांनी चंदन बियांचा मोफत पुरवठा करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत त्यांनी ८ ते १० लाख बियांचा पुरवठा राज्यभरात विविध ठिकाणी केला आहे. चंदनाच्या बियांचा दर सुमारे २०० रुपये किलो इतका आहे. किलोमध्ये अडीच हजार इतक्या बिया असतात. मात्र चंदनाच्या बियांची उगवण क्षमता ही अत्यल्प असते. म्हणजे बुट्टीभर पेरले तर मूठभर उगवणार अशी काहीशी अवस्था असते. शंभर बिया पेरल्या तर १० ते २० टक्के इतकी उगवण असते. एक किलो बियांपासून २५० रोपे तयार होतात. रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्याचा वापर केला जातो. पेरणीसाठी जून महिना हा उत्तम असतो. पेरणीनंतर दोन महिन्यांनी उगवण येते. उगवण झाल्यावर पंधरवडय़ानंतर रोपाला पाने फुटल्यानंतर गादी वाफ्यावरील रोपे पिशवीत हलविली जातात. रोपे पिशवीत दोन वर्षांपर्यंत वाढविली जातात. तसे करावयाचे असेल तर दोन वर्षांत तीनवेळा पिशव्या बदलाव्या लागतात. उघडी रोपे पुरविण्याचे काम हरितमित्र परिवार करीत आहे. आजवर सुमारे ८ लाख रोपांचा मोफत पुरवठा केला आहे. या वर्षी दोन लाख मोफत रोपे वाटण्याचा संकल्प घागरे बोलून दाखवतात. चंदनाची लागवड पाच बाय पाच मीटर अंतरावर एक बाय मीटर खड्डय़ात केली जाते. खड्डा ५० टक्के माती व शेणखताने भरून घ्यायचा असतो. कोणत्याही प्रकारची जमीन यासाठी चालते. गुरे चराईपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. पाच ते सहा वर्षांत रोपांची उंची १२ ते १५ फूट अपेक्षित असते. एकरामध्ये सुमारे ५०० ते ६०० रोपे लावता येतात. २० वर्षांनंतर त्याची छाटणी केली जाते. त्यामुळे उत्पन्न घेण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. पण अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार चंदनशेती करताना दीर्घकाळ कसा गेला हे समजू शकत नाही. शिवाय वेगवेगळ्या प्रकारची आंतरपिके घेतली जात असल्याने त्यापासून मिळणारे उत्पन्न हे वेगळेच असते.
चंदनाची शेती शेतकऱ्याला श्रीमंत करणारी आहे. चंदनाच्या लाकडाचा भाव प्रति किलो ४ ते ५ हजार रुपये असा आहे. २० वष्रे वाढ झालेल्या चंदन झाडापासून २५ ते ३० किलो लाकूड मिळते. आजचा बाजारभाव पाहता सुमारे ५ ते ६ कोटींचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. चंदनाच्या तेलालाही प्रति लिटर ५ लाख रुपये असा दर मिळतो. राज्यात चंदनाच्या झाडामध्ये तेलाचे प्रमाण सरासरी पाच लिटर इतके आहे. प्रति हेक्टरी १०० लिटर तेल सहज मिळून जाते. मात्र तेल मिळवण्यासाठी जितके मजूर वापरावे लागतात. त्या तुलनेत त्यांची मजुरी परवडणारी नाही. चंदनाची बाजारपेठ जगभर आहे. पूर्वेकडील चीन, जपान, सिंगापूर, हाँगकाँग, तवान या देशांत मोठी मागणी आहे. चंदनाचे लाकूड कोरीव कामासाठी खासकरून वापरले जाते. त्यामुळे काष्ठशिल्प बनविण्यासाठी त्याची मागणी वाढत आहे. देवतांची मूर्ती, शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी १ मीटर लांबीचे व १२.५ सें.मी. गोलाईचे गाभ्याचे लाकूड आवश्यक असते. अशा प्रकारचे लाकूड २० वर्षांच्या लागवडीतून सहजपणे उपलब्ध होते. पावसाचे प्रमाण कमी होत चालले असताना दुष्काळी स्थितीत तग धरून राहणारी चंदनशेती लाभदायक ठरू शकते. बँकेतील ठेवीसारखा या शेतीचा फायदा करून घेता येणे सहज शक्य आहे. शासनानेही चंदनशेतीसाठी प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड व वैरण विकास योजनेंतर्गत याची लागवड करण्यासाठी अर्थसाहाय्य केले जाते. याचा लाभ घेत राज्याच्या अनेक भागांतील शेतकरी चंदनशेती करण्यासाठी पुढे येत आहेत.

परजीवीबद्दल संभ्रम
चंदनाचे झाड हे परजीवी असल्याचे एक मतप्रवाह आहे. तर काही अभ्यासकांच्या मते चंदनाचे झाड स्वत:च वाढत असल्याने ते परजीवी असल्याचा प्रश्न उद्भवत नाही. याविषयी दोन मतप्रवाह प्रचलित आहेत. िहगोली, अकोला या भागांत चंदनशेती केलेल्यांची मते ही चंदनाचे झाड अर्धपरजीवी/परजीवी स्वरूपाचे असल्याचे म्हणणे आहे. त्यासाठी ते चंदनाच्या शेजारी तुरी, कडू बदाम वृक्षाची लागवड करतात. तर हरितमित्र संघटना मात्र चंदनाचे झाड स्वत:च वाढत असल्याने ते परजीवी असल्याचे म्हणणे खोडून काढते.

mla jayant patil praises sharad pawar for success in lok sabha election
राष्ट्रवादीच्या यशाचे श्रेय शरद पवारांच्या अथक परिश्रम व त्यांच्या प्रभावाला – आ. जयंत पाटील
Read Special Article on Dombivli blast and fire Incidents
डोंबिवलीचं ‘धगधगतं’ वास्तव; टाईमबॉम्बच्या वातीवर वसलेलं शहर!
Carrot rise recipe Gajracha Bhat Recipe In Marathi
रात्रीच्या जेवणाचा चमचमीत बेत; रुचकर मऊ आणि लुसलुशीत गाजराचा भात, ‘ही’ घ्या सोपी रेसिपी
sangli banyan tree marathi news
सांगली: चार शतकांचा साक्षीदार असणारा वटवृक्ष कोसळला
rainy weather, Solapur,
सोलापुरात पावसाळी वातावरणामुळे खरीप पेरण्यांसाठी शेतकऱ्यांचा उत्साह
sharad pawar letter to cm eknath shinde
राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून शरद पवार आक्रमक; मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला इशारा; म्हणाले…
palghar
शहरबात: पैशाचा पाऊस
Why did tiger attacks increase in East Vidarbha
वाघच करू लागलेत माणसाची शिकार! पूर्व विदर्भात व्याघ्रहल्ले का वाढले?

चंदनमित्र मिहद्र घागरे यांचे योगदान
चंदनशेती राज्यात बहरावी यासाठी हरितमित्र परिवाराचे मिहद्र घागरे हे अनेक वर्षांपासून चंदनाप्रमाणे झिजत आहेत. पदरमोड करून दरवर्षी चंदनाच्या बिया मोफत पुरवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. महिन्याला आठ ते दहा ठिकाणी त्यांची व्याख्याने वनविभाग, महाविद्यालये, वाचनालये अशा ठिकाणी होत असतात. वनविभागाच्यावतीने त्यांना चंदनशेती करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश अशा सर्व भागांमध्ये चंदनशेतीचे प्रमाण वाढत चालले आहे.
दयानंद लिपारे  – dayanandlipare@gmail.com