Navratri 2023 Marathi News : छत्रपती संभाजीनगर: देवीचा महिमा आणि लोकगीतातून आपली गुजराण करणाऱ्या गोंधळी गीतांचे व संबळ वादनाचे सार्वजनिक कार्यक्रम सरकारने हाती घ्यावेत. संबळाला प्रतिष्ठा मिळवून देताना राज्य म्हणून या वाद्याचे ब्रॅन्डिंग करावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे. गेली अनेक वर्षे जागरण गोंधळ करणारे राजाभाऊ गोंधळी म्हणाले, लोकगीतांचा मोठा ठेवा महाराष्ट्रात आहे. त्याचे जतन व्हायला हवे.

तुळजापूर येथील देवी मंदिरात राजाभाऊ गाेंधळी यांचा आवाज आता मंदिर परिसर भारून टाकतो. त्यांचा संबळ मंदिरभर निनादतो. ते म्हणत होते –

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले

‘ आम्ही जरी चुकलो जरी तरी, तू चुकू नको अंबाबाई गं

तुझे नाव आनंदी साजे गं

तुझा महिमा त्रिभुवनी गाजे गं

तुज वंदिता शूर मुनी राजे हो

तुझ पित पितांबर साजे गं…

तू चुकू नको अंबा बाई गं, आम्ही चुकलो तरी जरी…

न लिहिलेली अशी असंख्य लोकगीते देवीचरणी अर्पिलेली. भावभक्तीची एक प्रकारची गाथा तशी लिखित स्वरुपात कधी पुढे आली नाही. पण संबळाच्या निनादात आजही लोकगीतांचा वारसा जपणारे अनेक जण आहेत गावोगावी. मोठ्या कष्टात कला जपणारी ही मंडळी आता ‘ जागरण गोंधळा’वर गुजराण करते. एरवी सांस्कृतिक कार्यक्रमात मिरवायला जाणारा संबळ आणि गोंधळी याचा इतिहासही मोठा.

संबळाचे दोन भाग, म्हणजे दोन राक्षसाची मुंडकी. एकाचं नाव चंड आणि दुसऱ्याचं नाव मुंड. खालच्या बाजूला एका अर्धगोलाकृती आकारावर चामडे आवळल्यानंतरचा होणारा कडकडाट महाराष्ट्राला शोभणारा. तीच खरी तर संस्कृतिक ओळख. पण तमाशानं ढोलकीला मिळालेल्या महत्त्वामुळे तसा संबळ मागे पडला. राजाभाऊ सारखी अनेक मंडळी गोंधळी समाजाचं संघटन करत आहेत. ते म्हणाले, ‘राज्यात हजार एक गोंधळी मिळून एखादा कार्यक्रम घडवून आणला तर ही संस्कृती जगभर पोहोचेल.’

नवरात्री तसेच कोजागिरी पोर्णिमेला देवीची मूर्ती उचलून पालखीत ठेवली जाते. मंदिरातील मूर्ती उचलली जात असल्याने तिला चल मूर्ती म्हटले जाते. या मूर्तीसह मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. या प्रदक्षिणेला छबिना असे म्हणतात. या वेळी संबळ वाजवला जातो. त्या वेळी देवीचा महिमा वर्णन करणारी वेगळी लोकगीतं आहेत.

निरगुण असता मुळमाया

सगुणा आली दैत्य वधाया

निरचीर मुनी पार कराया

आई अवतरली या धरणी

भव दृष्ट रं, भव दृष्ट रं आई दु:ख हरणी गे

राजाभाऊ गोंधळी म्हणाले, आता संबळ तसा पाच हजार रुपयांपर्यंत मिळतो. पहिल्यांदा हा भैरवासमोर वाजवला. ज्याला मेण लावलेला असतो तो मुंड. अगदी जेवढे बोल तबला आणि ढोलकीवर वाजिवले जाऊ शकतात तेवढे सारे संबळावरही वाजविता येतात. पण देवीच्या गाण्यांचा साज चढविणारे हे रणवाद्य आहे. त्यामुळे याचा आवाज आसमंत भारून टाकतो. गोष्ट सांगणारा, गाणं म्हणणारा, विनोद पेरून उत्तररात्रीपर्यंत जागरण गोंधळ करणारा समाज आता तसा उपेक्षित आहे. अलीकडे लग्नसराईमध्ये त्यांना बऱ्याबैकी पैसे मिळत असले तरी साज आणि साजिंदे यांची संख्या जास्त असल्याने काही माेजके दिवस काम मिळते.