04 August 2020

News Flash

दोन फैरी झाडून डोक्याला पिस्तूल

शहरातील माळीवेस ते सावतामाळी चौक रस्त्यावर असलेल्या राजेश ट्रेडर्स या भांडय़ाच्या दुकानात पाच-सहाजणांनी घुसून दोन फैरी झाडून १० लाख ५४ हजार रुपयांची रक्कम लुटली.

| October 26, 2014 01:52 am

शहरातील माळीवेस ते सावतामाळी चौक रस्त्यावर असलेल्या राजेश ट्रेडर्स या भांडय़ाच्या दुकानात पाच-सहाजणांनी घुसून दोन फैरी झाडून दुकान मालकाच्या डोक्याला पिस्तूल लावत १० लाख ५४ हजार रुपयांची रक्कम लुटली. दिवाळी पाडव्याच्या रात्री साडेआठच्या सुमारास हा थरार घडला. शहर पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
सुजित सुरेंद्र काटकर यांच्या मालकीचे राजेश ट्रेडर्स नावाचे भांडय़ाचे दुकान आहे. शुक्रवारी काटकर व त्यांचे वडील हे दोघे दुकानात हिशेब करीत बसले होते. या वेळी दुकानात घुसलेल्या ५-६जणांनी काटकर यांच्या डोक्याला पिस्तूल लावले व त्यांच्या खिशातील गल्ल्याची किल्ली घेऊन १० लाख ५४ हजार रुपयांची रोकड लुटीली. चोरटय़ांनी सुरेंद्र काटकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यात ते जखमी झाले. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. सुजित काटकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2014 1:52 am

Web Title: 10 5 lakh loot beed
Next Stories
1 कव्हेकरांचे पुन्हा ‘एकला चलो रे’
2 मागील अधिक्याइतकीच जयदत्त क्षीरसागरांना मते
3 हैदराबाद पोलिसांसह एटीएसकडून चौकशी
Just Now!
X