जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघात ६ लाख ७२ हजार २०३ पुरुष व ६ लाख १३ हजार ५१९ स्त्री असे एकूण १२ लाख ८५ हजार ७३१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण १ हजार ३४० केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. पी. सिंह यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच जिल्हाधिकारी सिंह यांनी पत्रकार बठकीत निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड व पाथरी या ४ मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. जिंतूरमध्ये ३५६, परभणी २८७, गंगाखेड ३५३ व पाथरी मतदारसंघात ३४४ केंद्रांवर मतदान होईल. जिंतूर मतदारसंघात ३ लाख १९ हजार ८२१, परभणी २ लाख ७८ हजार २३३, गंगाखेड ३ लाख ५९ हजार ७९ व पाथरी मतदारसंघात ३ लाख २८ हजार ५८८ मतदार आहेत. १८ ते १९ वयोगटातील मतदार संख्या जिंतूरमध्ये ८ हजार ३९६, परभणी ७ हजार ६०१, गंगाखेड १० हजार १७७ व पाथरीत ७ हजार ७७३ आहे.
उद्या विशेष मोहीम
दरम्यान, नवीन मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी, दुरुस्त करणे, छायाचित्र उपलब्ध करणे यासाठी रविवारी (दि. १४) विशेष रविवारचे आयोजन करण्यात आले आहे. या कामासाठी सर्वच मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १२ भरारी पथके, १२ आचारसंहिता व १२ सनियंत्रण पथके तनात आहेत. ही पथके निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यापासून कार्यरत होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत जिल्ह्यातील वाहनांची तपासणी केली जाणार आहे. पशांचा गरवापर टाळण्यासाठी सशस्त्र अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नाकेबंदी करून तपासणी होणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, सहायक पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उपस्थित होते.