रायगड जिल्ह्य़ातील कोलाड लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या २८ धरणांपैकी तब्बल १७ धरणे भरली आहेत, तर अन्य पाच धरणेही पन्नास टक्क्य़ांहून अधिक भरली आहेत. साधारणपणे जुलै महिन्याच्या उत्तरार्धात भरणारी ही धरणे चांगल्या पावसामुळे यंदा जूनमध्येच भरली आहेत. रायगड जिल्ह्य़ात पावसाळ्यात सरासरी साडेतीन हजार मिलिमीटर पावसाची नोंद होत असते, पण या वर्षी जून महिन्यातच जिल्ह्य़ात सरासरी ४१ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात मोठी वाढ दिसून आली आहे. जिल्ह्य़ात लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणारी २८ धरणे आहेत. यातील १७ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.  दोन धरणे ७५ टक्केपेक्षा अधिक भरली आहेत,
तर तीन धरणे ही ५० टक्क्य़ांहून अधिक भरली आहेत. जिल्ह्य़ातील केवळ ६ धरणांत ५० टक्क्य़ांहून कमी पाणीसाठा आहे. मात्र पावसाचा जोर लक्षात घेता पाणीसाठय़ात वाढ होण्याची शक्यता आहे.
 भरलेल्या १७ धरणांमध्ये सुधागड तालुक्यातील कोंडगाव, घोटवडे, कवळे आणि उन्हेरे या चार धरणांचा समावेश आहे. तर महाड तालुक्यातील खैरे, वरंध, खिंडवाडी आणि कोथुर्डे या चार धरणांचा समावेश आहे.
खालापूर तालुक्यातील डोणवत, कोलते मोकाशी आणि भिलवले ही तीन धरणे भरली आहेत. म्हसळ्यातील संदेरी, रोह्य़ातील सुतारवाडी, मुरुडमधील फणसाड तर पनवेलमधील मोरबे धरण भरले आहे. भरलेल्या धरणांमधुन पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
Solapur District, Unseasonal Rain, Winds, Damage, lightning, one girl and 2 animals died, Unseasonal Rain in Solapur, solapur unseasonal rain, damage crops, farmers, solapur news,
सोलापूर व ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे नुकसान
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर