27 February 2021

News Flash

पेणमध्ये भररस्त्यात गोळीबार करुन तरुणाची आत्महत्या

पनवेल नेरे येथे राहणाऱ्या तेजस फडके (वय २५) या तरुणाने सोमवारी रात्री पारिजात सोसायटी परिसरातील कारमेल शाळेजवळ गोळीबार केला.

प्रतिकात्मक छायाचित्र

पेणमधील पारिजात सोसायटी परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ वर्षांच्या तरुणाने सोमवारी रात्री भररस्त्यात गोळीबार करुन पळ काढला. मात्र, काही वेळाच त्याने देखील आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पनवेल नेरे येथे राहणाऱ्या तेजस फडके (वय २५) या तरुणाने सोमवारी रात्री पारिजात सोसायटी परिसरातील कारमेल शाळेजवळ गोळीबार केला. तेजस हा मद्यधूंद अवस्थेत होता. तिथून पळून गेल्यावर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह पेणमधील पशुवैद्यकीय रुग्णालयाजवळ एका कारमध्ये सापडला. या संपूर्ण घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तेजस तिथे काय करत होता, त्याने गोळीबार कोणावर केला, याबाबतचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 9:47 am

Web Title: 25 year old youth firing in public place later shoots himself in pen
Next Stories
1 दोन चिमुकल्यांची हौदात बुडवून हत्या, निर्दयी मातेला अटक
2 मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या
3 वल्लभभाईंना तरी कसे पटेल? : राज ठाकरे
Just Now!
X