रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्याची चिन्ह काही दिसत  नाहीत. रविवारी दिवसभरात करोनाचे ४४९ नवे रुग्ण आढळून आले व  ९ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यातल्या त्यात दिलासादायक म्हणजे आज दिवसभरात ६४८ जण उपचारानंतर पुर्ण बरे झाले आहेत.

सध्या जिल्ह्यात ३ हजार ६९७ करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ९ हजार ५२२ रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. ३५९ जणांचा करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकुण करोनाबाधितांची संख्या १३ हजार ५७८ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात ४४९ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात  पनवेल मनपा हद्दीतील-१३५, पनवेल ग्रामीणमधील – ५२, उरण – ३०, खालापूर – ६३, कर्जत – १६, पेण – २३, अलिबाग – १८, माणगाव- २८, तळा – १, रोहा- ३५, सुधागड- ६, श्रीवर्धन- २, म्हसळा- ३, महाड-१९ पोलादपूर-४ रुग्णांचा समावेश आहे. तर, दिवसभरात पनवेल ग्रामीण-२, खालापूर-३, पेण- १, महाड-२, पोलादपूर-१ जणाचा येथे रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६४८ जण करोनातून पुर्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील ४३ हजार ५९० जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ६९७ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १ हजार ३९६, पनवेल ग्रामिण हद्दीतील ३९०, उरण मधील १५८, खालापूर ३१७, कर्जत १००, पेण २६४, अलिबाग २६४, मुरुड ५६, माणगाव ९९, तळा येथील २, रोहा १४९, सुधागड १५, श्रीवर्धन २८, म्हसळा ६१, महाड १७२, पोलादपूर मधील १८ करोना बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची प्रमाण ७१ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे

टाळेबंदीच्या दहा दिवसात ४ हजार रुग्ण वाढले
करोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात दहा दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली होती. १५ जुलै ते २४ जुलै या टाळेबंदीच्या दहा दिवसात जिल्ह्यात ४ हजार ७४ नवे रुग्ण आढळून आले. दरम्यान ११२ जणांचा मृत्यू झाला. ३ हजार ५१६ जण करोनामुक्त झाले. लोकांच्या वाढत्या विरोधामुळे टाळेबंदी दोन दिवस अगोदरच मागे घेण्यात आली. पण टाळेबंदीच्या कठोर अमंलबजावणी नंतरही करोनाची साखळी तुटू शकली नाही.