नागपुरातल्या पाच मशिदींधून ५२ लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हे सगळेजण दिल्लीत झालेल्या मरकजमध्ये सहभागी झाले होते अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून साधारण १४०० लोक तबलिगी जमातीच्या मरकजमध्ये गेले होते. यापैकी १ हजारपेक्षा जास्त लोकांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली. आता आणखी ५२ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

मरकजमध्ये सहभागी झालेले लोक हे महाराष्ट्रातल्या विविध भागांमधून आले होते. औरंगाबाद, पनवेल, वसई, नाशिक, पिंपरी चिंचवड, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमधून हे लोक गेले होते. आता नागपुरातल्या ५२ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातल्या विविध भागांमधले लोक मरकजला उपस्थित राहिले. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. दरम्यान निजामुद्दीनसारखे प्रकार महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. करोनाचे संकट संपेस्तोवर महाराष्ट्रात कोणत्याही जाती, धर्माचे सण किंवा मेळावे होणार नाहीत याची काळजी घ्या, प्रसंगी मी स्वतः आयोजकांशी बोलेन असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर गुरुवारपर्यंत साधारण १ हजार जणांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. आता आज आणखी ५२ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.