03 March 2021

News Flash

नागपुरात ४ वर्षांच्या चिमुरडीवर २५ वर्षीय नराधमाकडून बलात्कार

पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे

(सांकेतिक छायाचित्र)

नागपुरात एका ४ वर्षांच्या चिमुरडीवर २५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. नागपुरातल्या वाडी या ठिकाणी हा प्रकार घडला आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. भूषण डहाट असं या नराधमाचं नाव आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक आर. एल. पाठक यांनी दिली आहे. या नराधमाने चार वर्षांच्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवला आणि तिच्यावर बलात्कार केला असे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

नागपूर अमरावती रस्त्यावर असलेल्या एका प्राथमिक शाळेच्या आवारात ही घटना घडली. पीडित मुलीची आई परिसरातल्या इमारतींमध्ये धुणे-भांड्यांची कामं करते. सोमवारी दुपारी ही मुलगी खेळत असताना तिथे भूषण आला आणि या मुलीला एका खोलीत घेऊन गेला. तिथे अश्लील व्हिडिओ दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला. संध्याकाळी पीडित मुलीच्या आईने मुलीच्या अंगावर काही खुणा पाहिल्या. ज्यानंतर तिने मुलीला याबाबत विचारले असता तिने जे काही घडले ते सांगितले. पीडित मुलीच्या आईने भूषणला फोन करण्याचाही प्रयत्न केला मात्र तो फोन बंद करून फरार झाला आहे. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 2:36 pm

Web Title: a 4 year old girl was allegedly raped by a 25 year old man in wadi nagpur scj 81
Next Stories
1 राजकीय सूडबुद्धीतून माझ्याविरोधात हायकोर्टात याचिका: धनंजय मुंडे
2 नागपुरात उभारणार रामदेवबाबा विद्यापीठ, मंत्रिमंडळाची मान्यता
3 धनंजय मुंडे अडचणीत, जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
Just Now!
X