कर्नाटकातील विजापूर (विजयपूर) जिल्ह्यात बोलेरो गाडी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बोलेरोतील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी आहे. जखमींना उपचारासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोलेरोत पुण्यातील कामगार असल्याचे सांगण्यात येते.

विजयपूर येथील बबलेश्वर तालुक्यातील होनगनहळ्ळी गावाजवळ हा अपघात झाला. कामगारांना घेऊन जाणारी भरधाव बोलेरो (एमएच १२ क्यूजी ४७६६) ही ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात बोलेरोचा पूर्णपणे चुराडा झाला. बोलेरोतील ५ जण जागेवरच ठार झाले. दोघे गंभीर जखमी आहेत. सर्व मृत हे पुण्यातील असून ते महामार्गावरील कामगार आहेत.

दरम्यान, या अपघाताप्रकरणी बबलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.