News Flash

वाढदिवशीच तरुणाची आत्महत्या; संध्याकाळी पार्टी देणार होता, पण…

पार्टीचे नियोजन असल्याने मित्र त्याची वाट पहात होते. त्यांनी नीलेशच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली. तेव्हा नीलेश घरी नव्हता

प्रतिकात्मक छायाचित्र

अहमदनगरमध्ये एका तरुणाने रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून नीलेश जपकर असे या तरुणाचे नाव आहे. वाढदिवशीच नीलेशने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर तालुक्यातील नेप्ती गावात नीलेश जपकर राहत होता. नीलेश जपकर (वय २१) याचा शनिवारी वाढदिवस होता. शनिवारी दुपारी त्याने मित्रासोबत वाढदिवस साजरा केला. रात्री मित्रांसाठी पार्टीचेही आयोजन केले होते. नीलेश हा कल्याण रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये नोकरीला होता. संध्याकाळच्या सुमारास तो हॉटेलमधून अचानक निघून गेला. वाढदिवसानिमित्त मित्रांसमवेत गेला असावा, असे सर्वांना वाटत होते.

पार्टीचे नियोजन असल्याने मित्र त्याची वाट पहात होते. त्यांनी नीलेशच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली. तेव्हा नीलेश घरी नव्हता. रात्री दहाच्या सुमारास नीलेशचा मृतदेह नगर-मनमाड रेल्वेमार्गावर आढळला. नगर-मनमाड रेल्वेमार्गावर तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. नीलेशने ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. नीलेशने आत्महत्या का केली, याचा पोलीस तपास करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 9:36 am

Web Title: ahmednagar 21 year old commits suicide on his birthday jumping in front of train
Next Stories
1 पाकिस्तानशी युद्ध करणे योग्य आहे का?, जाणून घ्या उज्ज्वल निकम यांचे मत
2 ‘शहीदांचा बदला घेण्यासाठी भाजपाला मतं द्या म्हणणं हा मढ्यावरचं लोणी खाण्याचा प्रकार’
3 माश्यांची आवक घटली, दर वाढले..
Just Now!
X