News Flash

अजित पवारांनी दिली कर्जमाफीची आकडेवारी : आतापर्यंत ११,४६८ कोटी केले खात्यात जमा

किती शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ झाला

(संग्रहित छायाचित्र)

आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला, किती कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असे अनेक प्रश्न सरकारकडून विचारले जात आहेत. त्याची उत्तरं आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टि्वटरवरून दिली आहेत. आतापर्यंत ११ हजार ४६८ कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवार यांनी याबाबत सविस्तर टि्वट केले आहे. ते असे… “महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत शुक्रवार, दि. १३ मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १८ लाख २ हजार ४३ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११,४६८.३६ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे.” याचाच अर्थ असा की १३ मार्चपर्यंत राज्यातील १७ लाख २ हजार ४३ शेतकऱ्यांना सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे.

अजित पवार यांनी आणखी एक टि्वट करून कोणत्या बँकांमध्ये किती रक्कम जमा केली, हेही स्पष्ट केले आहे. त्यांनी टि्वट केले की, “जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४ हजार ४४७ शेतकऱ्यांच्या खात्यात ५२७५.८६ कोटींची तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ७ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांच्या खात्यात ६१९२.५० कोटी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 12:57 pm

Web Title: ajit pawar on farmers loan waiver how many people got benefit pkd 81
Next Stories
1 औरंगाबादमध्ये आणखी एक महिला करोनाग्रस्त, राज्यातली संख्या ३२ वर
2 मुंबई ते मांडवा आता पाऊण तासात, रो-रो सेवेचा शुभारंभ
3 निलेश साबळे, भाऊ आणि कुशल विरोधात संभाजी ब्रिगेडची पोलिसात तक्रार
Just Now!
X