केंद्र सरकारकडून गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी विशेष तपास पदकांची घोषणा करण्यात आली. देशभरातील १२१ पोलीस अधिकाऱ्यांना हे पोलीस तपास पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यात रायगड जिल्ह्यतील कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांचाही समावेश आहे. सर्वोत्कृष्ट तपासासाठी त्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. घेरेडीकर हे सन २०१६ ते मार्च २०१९ याकालावधीत परभणी जिल्ह्य़ातील जिंतूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत होते. या कालावधीत बोरी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये १ जानेवारी २०१८ रोजी बोरी येथील एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती.  या प्रकरणी भादवि कलम ३७६, ३२३.५०६ पोस्को कलम ४ अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता. कुठलाही ठोस पुरावा आणि साक्षीदार उपलब्ध नसताना अनिल घेरेडीकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. तांत्रिक पुरावे संकलित करून या गुन्ह्यतील आरोपीचा मागोवा घेतला. आणि त्यास अटक केली. आरोपीविरुद्ध तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा पोलीस तपास ग्रा धरून न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या कामगिरीची दखल घेऊन घेरेडीकर त्यांना केंद्रीय गृहविभागाकडून सर्वोत्कृष्ट तपास पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.

ajit pawar ncp s mla, dilip mohite, collector office, amol kolhe, nomination form, shirur lok sabha constituency, lok sabha 2024, election 2024, shirur news, politics news, pune news,
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
bharti kamdi marathi news, bharti kamdi palghar latest news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान
Transfer, social justice department
सामाजिक न्याय विभागात एकच अधिकारी दहा वर्षांपासून एकाच पदावर, पुन्हा नवीन कार्यभार…