टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राचे देशभरातून कौतुक झाले. भालाफेकमध्ये नीरजने पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकले. या सोनेरी कामगिरीनंतर देशात त्याच्यासाठी अनेक कलाकृती तयार करण्यात आल्या. चेतन राऊत यांनी मोझॅक कलाकृतीतून नीरजचे पोर्ट्रेट तयार केले होते. आता कोकणातील मूर्तिकार आशिष संसारे यांनी नीरजच्या रुपात गणेशमूर्ती साकारली आहे.

ही गणेशमूर्ती मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी यंदा गणेशोत्सवात स्थानापन्न होणार आहे. रत्नागिरीतील आशिष संसारे यांनी तयार केलेली ही मूर्ती कुलगुरूंच्याच्या कल्पक विचारातून आली आहे. देशमुख हे स्वतः खूप हौशी असून दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर गणेशमूर्ती साकारण्याची त्यांना आवड आहे.

हेही वाचा – VIDEO : ऐतिहासिक विजय..! तुम्ही मैदानावरील जल्लोष पाहिला, पण ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं ते पाहिलं का?

सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती सकारावी, असे त्यांच्या मनात आले. त्यांनी ही संकल्पना संसारे यांना बोलून दाखविली. त्यानुसार संसारे यांनी नीरजच्या स्वरूपातील भालाफेक करताना अत्यंत सुबक मूर्ती साकारली आहे. याआधी त्यांनी प्रो कबड्डी सुरू झाल्यानंतर उंदरांसोबत खेळतानाचा गणपती, झाड लावताना गणपती अशा स्वरुपातील मूर्ती साकारल्या होत्या.

मूर्तिकार आशिष संसारे

 

नीरजच्या रुपातील ही गणेशमूर्ती दीड फुट उंच आहे. शाडू मातीतील या मूर्तीचा तोल सांभाळणे आव्हानात्मक होते. ट्रॅक अँड फील्डमध्ये भारताला पहिलेच सुवर्ण मिळवून देणाऱ्या नीरजची मूर्ती साकारणे माझ्यासाठी अभिमानास्पद होते, असे संसारे यांनी साकारले. आशिष संसारे हे रत्नागिरीतील प्रसिद्ध मूर्तिकार असून त्यांचा पिढीजात गणेशमूर्ती कारखाना आहे. त्यांचे आजोबा रघुनाथ सखाराम संसारे यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांचे वडील अशोक संसारे, काका प्रभाकर संसारे यांनी सुरु ठेवली. आता त्यांचा हा वारसा आशिष संसारे सांभाळत आहेत.