News Flash

कुत्र्यांच्या हल्ल्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू

अनिकेत नाईक या विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार जिल्ह्य़ात घडली.

(संग्रहित छायाचित्र)

नंदुरबार : कुत्र्यांनी चावा घेतलेल्या आश्रमशाळेतील अनिकेत नाईक या विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार जिल्ह्य़ात घडली. नवापूर तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या धनराट येथील शासकीय आश्रमशाळेत हा विद्यर्थी  सहावीत शिक्षण घेत होता.

रविवारी रात्री जेवणानंतर तो मित्रांसमवेत आश्रमशाळेच्या मागील बाजूस असलेल्या प्रांगणात फिरण्यासाठी गेला. याठिकाणी त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. त्याच्या सोबतचे इतर विद्यार्थी पळण्यात यशस्वी झाले, परंतु चार कुत्र्यांनी अनिकेतवर हल्ला केल्याने त्याला जबर जखमा झाल्या. त्याच्या रक्तवाहिन्या देखील फाटल्या होत्या. त्याला रात्री उशीरा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तातडीने शस्त्रक्रियादेखील करण्यात आली, परंतु सोमवारी त्याचा मृत्यू झाला. आश्रमशाळेच्या मागील भागात काही कुक्कटपालक व्यावसायिकांनी फेकलेल्या घाणीमुळे याठिकाणी कुत्र्यांचा मोठय़ा प्रमाणात वावर झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 1:58 am

Web Title: ashram school student killed in stray dogs attack
Next Stories
1 गडचिरोलीच्या आठ पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पदक
2 ‘कॉसमॉस’वर सायबर दरोडा
3 कॉसमॉस बँकेची ऑनलाइन, एटीएम सेवा तीन दिवस बंद राहणार, बँकेतून व्यवहार करण्याचे आवाहन
Just Now!
X