जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने 72 वर्षीय करोना बाधित रुग्णाचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. वीज गेल्यानंतर श्वास यंत्र बंद पडल्याने रूण्णाला कसा त्रास होवून मृत्यू ओढवला याची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. रूण्नाचा मृत्यू कृत्रिम श्वसन यंत्र बंद पडल्यानेच झाल असा आरोप करुण चौकशी ची मागणी मृत रुग्णाच्या मुलाने केली आहे.कोरोना बाधिताची संख्या दररोज दुप्पट वाढत असून सरकारी रुग्णालयातील सुविधा आणि उपचारांविषयी तक्रारी वाढल्या आहेत. अपुरे मनुष्यबळा मुळे रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. शुक्रवारी दि.३१ जुलै पर्यंत तीस रूण्णांना कोरोनाने बळी घेतला असून बाधिताची संख्या सातशे पार गेली आहे.

बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात 70 पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. गेवराई येथील 72 वर्षीय वृद्धावर याच कक्षात उपचार सुरू होते. बुधवारी रात्री वीज पुरवठा खंडित झाल्याने कक्षातील कृत्रिम श्वसन यंत्र ( व्हेंटिलेटर ) बंद पडल्याने वृद्ध रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. वैद्यकीय अधिकारी हजर होते पण पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांनाही काही करता आले नाही. अर्धा तास कृत्रिम श्वसन यंत्र बंद असल्याने वृध्द रुग्ण बेशुद्ध झाला आणि गुरुवारी रात्री अखेर वृद्धाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी सदरील घटनेची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली. कृत्रिम श्वसन यंत्र बंद पडल्यानंतर वृध्द रुग्ण कशा पद्धतीने मदतीसाठी हाक देतो, त्याला होणारा त्रासही त्यामध्ये स्पष्ट दिसतो. या चित्र फितीने सरकारी रुग्णालयातील कारभार समोर आला आहे.रूण्न वाढल्याने आता हेळसांड होवू लागली आहे.केवळ श्वसन यंत्र बंद पडल्यानेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मयत रुग्णाच्या मुलाने केली आहे.या घटनेचा बाबत कोणीही अधिकृतपणे बोलायला तयार नाही.