कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी विशेष चौकशी पथकामार्फत (SIT) या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ज्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र २५ जानेवारीला हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्रलायने एनआयएकडे सोपवले. ज्यानंतर केंद्र सरकारवर शरद पवार, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री यांनी टीकास्त्र सोडलं. असं असलं तरीही हा निर्णय मागे घेण्यात आलेला नाही. आता पुणे पोलीस मुख्यालयात एनआयएचं पथक दाखल झालं आहे.