अजित पवार यांनी महाराष्ट्राला जे चित्र दाखवलंय ते महाराष्ट्र अजून विसरलेला नाही.घोटाळे, सिंचन, बँका, वक्तव्य, ते गप्प राहिले असते आणि पाच वर्ष उपमुख्यमंत्रीपद उपभोगलं असतं तर काही वाटलं नसतं. अजित पवार हे स्वत:च्या कर्तुत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडणून आणू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे, असं म्हणत भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. दुसऱ्या पक्षात गेलेल्यांनी परत यावं महाविकास आघाडीचा एकच उमेदवार देऊन त्यांना आपण निवडून आणू असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरून निलेश राणे यांनी टीका केली. आज त्यांना जे काही मिळालं आहे ते शरद पवारांमुळेच त्यावर त्यांनी स्वत:चं लेबल लावू नये असंही राणे म्हणाले.

“एका वर्षानंतर मागे जे काही झालं त्यावरून लोकं मागचं विसरली असं अजित पवार यांना वाटत असावं. आज आमदारांना येण्यास जे ते सांगतायत त्यांना वर्षभरापूर्वी स्वत:चे आमदार टिकवता आले नाहीत. अजित पवार हे आता बोलायला लागलेत. अजित पवारांचा इतिहास पाहिला तर त्यात लोकोपयोगी कामं दिसणार नाहीत. घोटाळे, त्यांची वक्तव्य यामुळेच ते चर्चेत असतात. लोकोपयोगी कामांसाठी अजित पवार हे चर्चेत नसतात,” असं राणे यावेळी म्हणाले. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी पवारांवर जोरदार टीका केली.

“तुम्ही आमच्याकडे या आम्ही निवडून देऊ, तुमच्याकडे तुम्हाला आमदार राखता आले नाहीत. त्यामुळे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन ते सरकार सोडावं लागलं. ज्यांच्याकडे एकही आमदार राहायला तयार नव्हता ते अजित पवार आम्हाला आठवतात. अजित पवारांची स्वत:ची ताकद नाही. बारामतीत जी ताकद आहे ती शरद पवार यांनी स्वत: निर्माण केलेली आणि टिकवलेली आहे. अजूनही शरद पवार यांचं लहानसहान गोष्टींवरही लक्ष असतं. अजित पवार यांनी ते काही केलं नाही त्यामुळे ते काही श्रेय घेऊ शकत नाही. अजित पवारांचा स्वत:चा आमदार आहे असं चित्र महाराष्ट्रात तरी नाही त्यामुळे त्यांनी मोठ्या गोष्टी करू नये,” असंही त्यांनी नमूद केलं.”त्यांनी महाराष्ट्राला जे चित्र दाखवलं ते महाराष्ट्र विसरला नाही. घोटाळे, सिंचन, बँका, वक्तव्य, ते गप्प राहिले असते आणि पाच वर्ष उपमुख्यमंत्रीपद उपभोगलं असतं तर काही वाटलं नसतं. अजित पवार हे स्वत:च्या कर्तुत्वावर एक साधा ग्रामपंचायतीचा सदस्यही निवडू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

“अजित पवार आज म्हणतात मला ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी काय केलं या ३० वर्षांत. शरद पवार यांना बाजूला करून अजित पवार यांनी केलेली एक वास्तू तरी दाखवा. त्यांना जे काही मिळालंय ते शरद पवार यांच्यामुळे. नुसतं भाजपावर टीका करून तुमचं काम सोप होणार नाही. तुम्हाला काम करून दाखवावं लागेल,” असंही राणे म्हणाले.