भाविकांना दर्शनासाठी राज्यातील मंदिरं खुली करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील भाजपानं शनिवारी ‘दार उघड उध्दवा दार उघड’ या आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाला पांठीबा म्हणून खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी शनिवारी शिर्डीत आंदोलन केलं.  राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने शनिवार शिर्डी येथे सकाळी १० वाजता दार उघड उध्दवा दार उघड हे आंदोलन केलं. या आंदोलनाला पाठींबा म्हणून घंटानाद करण्यात आला.

आणखी वाचा- “मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद”… म्हणत कोल्हापुरात घंटानाद आंदोलन

डॉ.सुजय विखे पाटील म्हणले की, राज्यातील इतर सर्व व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली मात्र मंदीर उघण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय मागील पाच महीन्यांपासून बंद आहेत. शिर्डी येथील साईबाबांचे मंदीर बंद असल्याने येथील अर्थकारण ठप्प झाल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान होत आहे. याबाबत राज्य सरकारकडे वारंवार मागणी केली मंदीर सुरू करण्यात राज्य सरकार दिरंगाई का करते असा सवाल उपस्थित करून खा.डॉ.विखे पाटील म्हणाले की, दारूच्या दुकानापासून ते मॉल उघण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतात, मग मंदीरांबबातच वेळकाढूपणाचे धोरण का ॽ