राज्यातली मंदिरं सुरु करा ही मागणी करत भाजपाने राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. त्याच प्रमाणे शिर्डीतही भाजपाने  आंदोलन सुरु केलं आहे. शिर्डीतही  आंदोलन करत साईबाबांचे मंदिर सुरु करण्याची मागणी केली आहे. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातूनच नाही तर देशभरातून लोक येतात. मार्च महिन्याच्या लॉकडाउन पासून राज्यातली मंदिरं बंद आहेत. अनलॉकच्या दरम्यान बार आणि रेस्तराँ राज्य सरकारने सुरु केले मात्र मंदिरं बंद का असा प्रश्न विचारत भाजपाने राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे.

आणखी वाचा- बार सुरू झाले, देव कुलुपबंद का?; राज्यपाल कोश्यारींचा ठाकरे सरकारला सवाल

भाजपाने मंदिरं उघडण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे.  बार उघडले गेले आहेत, रेस्तराँ उघडले गेले आहेत मग मंदिरं आणि मशिदी बंद का? धर्मस्थळं बंद का? असा प्रश्न भाजपाच्या आंदोलकांनी विचारला आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे मंदिरं, मशिदी, चर्च सगळं बंद आहे. अनलॉकमध्ये काही गोष्टी सुरु होत आहेत. अशात मंदिर प्रवेशालाही परवानगी द्यावी अशी मागणी करत भाजपाने आंदोलन केलं.