24 September 2020

News Flash

रायगड पोलीस मुख्यालयाच्या आवारात दुचाकीचा स्फोट, एका पोलिसाचा मृत्यू

ठिकाणी स्फोट झाला त्या जागेपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर पोलिसांचा शस्त्रसाठा आहे

अलिबाग येथील पोलीस ठाण्याबाहेर स्फोट घडवून आणलेली मोटर सायकल

रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारात बुधवारी दुपारी दुचाकीचा स्फोट होऊन एक पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाला होता. रात्री उशीरा उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. निकेश पाटील असे पोलिसाचे नाव आहे.
निकेश पाटील श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तो प्रशिक्षणासाठी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात आला होता. बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयाच्या आवारात उभी असलेली मोटार सायकल निकेश सुरू करत असताना हा स्फोट झाला. या स्फोटात निकेश पाटील हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आणि अधिक उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले. मुंबईत उपचार सुरू असताना त्याचा बुधवारी रात्री मृत्यू झाला.
हा स्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या जागेपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर पोलिसांचा शस्त्रसाठा आहे. त्यामुळे पोलीस याकडे गांभीर्याने पाहात आहेत. पोलिसांकडून श्वान पथक तसेच मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने तपासणी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 2:05 am

Web Title: blast out side police station in alibaug
टॅग Blast
Next Stories
1 लाच घेतल्याप्रकरणी साताऱ्यातील तहसीलदार महिलेला तीन वर्षांची शिक्षा
2 रायगड पोलीस मुख्यालयाच्या आवारात दुचाकीचा स्फोट; एक पोलीस गंभीर जखमी
3 रायगड जिल्ह्य़ात ३६ ग्रामपंचायतींमध्ये आज मतदान
Just Now!
X