News Flash

मजुरांच्या घरात मालमोटार शिरल्याने दोघांचा मृत्यू ; चार जण जखमी

जालना शहराजवळ घडला अपघात

संग्रहीत

नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे काम करण्यासाठी बाहेरच्या राज्यातून आलेल्या मजुरांच्या घरात मालमोटार शिरल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज(रविवार) पहाटे जालना येथे घडली.

मालमोटार या कामगारांच्या पत्र्याच्या घरात शिरल्याने ही घटना घडली. जालना शहरापासून जवळ असलेल्या आंबेडकरवाडी परिसरातील महामार्गाच्या कामाजवळ झालेल्या या अपघातात धनिकराम छकू भूमिया(वय २२) आणि मुकेश गोरिलाल भूमिया(वय २२) या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही मध्यप्रदेशमधील कटनी जिल्हयातील रहिवासी होते. या अपघातात अन्य चार मजूर देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 9:27 pm

Web Title: both died when a car went into the laborers house msr 87
Next Stories
1 “लवकरच काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल आणि…”
2 Coronavirus : राज्यात आज ११ हजार १४१ करोनाबाधित वाढले, ३८ रुग्णांचा मृत्यू
3 औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाउन; प्रत्येक शनिवार – रविवार पूर्ण बंद
Just Now!
X