शहरातील समर्पण संस्था संचलित पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या वतीने एक जुलैपासून पक्षीशास्त्र, जैवविविधता, वन्यजीव आणि वने संवर्धन या तीन अभ्यासक्रमांना सुरूवात होत असून कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने त्यांना मान्यता देण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच  निसर्ग आणि वनसंवर्धन क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरू होत आहेत. या अभ्यासक्रमांना महाराष्ट्रातील अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत यामध्ये किशोर रिठे, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, डॉ. वरद गिरी, अभय उजागरे, मयुरेश कुलकर्णी, अनिल महाजन,  अमन गुजर यांचा समावेश आहे. अभ्यासक्रमांविषयी  अधिक माहितीसाठी समन्वयक राहुल सोनवणे ९२७००७६५७८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पर्यावरण शाळेचे संचालक राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.