News Flash

राम मंदिर नव्हे यांना सरकार बनवायचंय – भुजबळ

ही लढाई संविधान विरुद्ध मोदी अशी आहे.

आज महागाई इतकी वाढतेय की पिशवीतून पैसे न्यावे लागतील आणि खिशातून सामान आणावे लागतील एवढं जनतेने लक्षात घ्या असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत केले. मुलींना छळले जात असल्याने आत्महत्या करत आहेत आणि शेतकरीही सुखी नाही. तुम्हाला एवढं घडूनही दिसत नाही का असा संतप्त सवाल करतानाच परिवर्तन झालेच पाहिजे असेही आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सव्वाशे कोटी लोकांनी शिरोदत्त मानले आहे त्यामुळे सांगून ठेवतो राज्यातील कुठल्याही महिलेला किंवा कुटुंबांना त्रास दिला आणि त्यांना न्याय दिला नाही तर गप्प बसणार नाही असा इशाराही आमदार छगन भुजबळ यांनी दिला. एवढं सुंदर महाराष्ट्र सदन बांधले परंतु बनवणारा मात्र जेलमध्ये गेला. १०० कोटीचे कॉन्ट्रॅक्ट आणि मग मला साडेआठशे कोटी कसे मिळतील असा सवाल करतानाच या गोष्टीने छगन भुजबळ थांबणार नाही, घाबरणार नाही म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. अरे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर पंगा झाला… तुम्ही तर काय आहात असेही आमदार छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.

यांना राम मंदिर बनवायचं नाहीय., यांना सरकार बनवायचं आहे. पुन्हा एकदा जातीजातीमध्ये भांडणं लावून तुम्ही मुर्ख आहात हे दाखवून दयायचे काम सरकार करत आहे, असेही आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले. ही लढाई संविधान विरुद्ध मोदी अशी आहे. संविधानाने सव्वाशे कोटी लोकांना एका धाग्यात बांधून ठेवले आहे ते संविधान आपल्याला वाचवायचे आहे असे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 3:00 pm

Web Title: chagan bhujbal ncp ram mandir bjp
Next Stories
1 अमरावती येथे शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, तीन जखमी
2 मोदी सरकार बळीराजाशी बेईमान-शरद पवार
3 VIDEO: लहानपणी शाळेत न जाण्यासाठी उद्धव ठाकरे ही शक्कल लढवायचे
Just Now!
X