30 September 2020

News Flash

चंद्रपूर : खासगी सुरक्षा रक्षकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपूर जिल्ह्यात आत्महत्याचे सत्र सुरूच

प्रतिकात्मक फोटो

या जिल्ह्यात दररोज आत्महत्याचे सत्र सुरू असून चंद्रपूर शहरात आज नागपूर रोडवरील वड़गाव परिसरातील आंबेडकर सभागृह जवळ रत्याच्या कड़ेला असलेल्या लिंबाच्या झाड़ाला गळफांस घेऊन, एकाने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळी या परिसरात मॉर्निंग वॉक करताना नागरिकाना एका व्यक्तीचा  मृतदेह झाडाला लटकलेले अवस्थेत आढळला. नागरिकांनी नगरसेवक पप्पू देशमुख यांना याबाबत माहिती दिली होती. रक्षित मेश्राम वय(45) असे मृत व्यक्तीचं नाव असून तो खासगी सुरक्षा रक्षक होता. या परिसररत मागील  वर्षभरापासून राहत असून कौटुंबिक वादातुन आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

रामनगर पोलीस पंचनामा करुन चौकशी करत आहेत. टाळेबंदीत अनेकांचा रोजगार बुडाला आहे. आत्महत्या करणारा व्यक्तीही बाहेरगावाहून रोजगाराच्या शोधत आला होता, अशी माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 12:27 pm

Web Title: chandrapur private security guard commits suicide by hanging himself from a tree msr 87
Next Stories
1 होतकरूंसाठी ‘ते’ ठरले खाकी वर्दीतील देवदूत
2 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रिंगण’च्या संत सोपानदेव विशेषांकाचं प्रकाशन
3 गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात…
Just Now!
X