News Flash

चंद्रपूर : मॉर्निंगवॉकसाठी घराबाहरे पडलेल्या मुलाचा जंगलात आढळला मृतदेह

मुलाला वाघानेच ठार केले असल्याचे स्थानिकांचे म्हणने ; परिसरात दहशतीचे वातावरण

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यामधील कापशी येथील संस्कार सतिश बुरले (वय-१०) हा मुलगा सकाळी फिरायला गेला होता. दरम्यान, बराचवेळा झाला तो न आल्याने शोधाशोध केली असता, त्याचा मृतदेह जंगलात आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मुलाला वाघाने उचलून नेले होते. ज्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात आढळल्याने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सावली या तालुक्याच्या ठिकाणाहून जवळ असलेल्या कापशी येथील रहिवासी संस्कार बुरले हा मुलगा सकाळी घराबाहेर पडला होता. दरम्यान मुख्य मार्गांने फिरत असताना वाघाने त्याला उचलून नेले. मुलगा घरी आला नाही म्हणून सर्वत्र शोध सुरू केला. गावातील अनेकजण रस्त्यावर व जंगलात शोध घेत असताना त्यांना मुलाचा मृतदेह जंगलात आढळून आला.

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातारण आहे. दरम्यान वाघ होता की बिबट्या हे सांगता येत नाही असे वन विभागाचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:15 pm

Web Title: chandrapur the body of a boy found in forest who went to a morning walk msr 87
Next Stories
1 मुंबई शिवसेनेच्या मालकीची नाहीये, ती…; संजय राऊतांनी भूमिका केली स्पष्ट
2 “… ते स्वतःचं कुटुंब सोडून कसलीच जबाबदारी घेत नाहीत”; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
3 ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’; चंद्रपूर जिल्ह्याचा ‘मिशन मॅथमॅटिक्स’ सर्जनशील उपक्रम
Just Now!
X