उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान सरासरीच्या खाली आले असून, मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण झाली आहे. रविवारी या हंगामातील सर्वाधिक कमी तापमान नाशिक येथे ४.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मुंबईत सांताक्रुझ येथे पहिल्यांदाच तापमान दहा अंशांपर्यंत खाली आले आहे. पुण्यात किमान तापमान ८.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. येत्या चोवीस तासांत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे .
उत्तरेकडील राज्ये थंडीने गारठली आहेत. हे थंड वारे दक्षिणेकडे वाहात असल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढत चालला आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे दिवसाही थंडी जाणवत आहे. राज्यात सगळीकडेच शेकोटय़ा पेटल्याचे चित्र दिसू लागले आहे.
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीच्या चार ते पाच अंशांनी तापमान कमी झाले असून, या ठिकाणी थंडीची लाट निर्माण झाली आहे. राज्यात येथे पहिल्यांदाच तापमान चार अंशांपर्यंत खाली आले आहे. त्याचबरोबर कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भात तापमान चांगले खाली गेले आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी निफाड येथे २.०७ पर्यंत पारा खाली घसरला. या हंगामातील हे जिल्ह्यातील सर्वात कमी तापमान असून नाशिक शहरातही ४.०७ इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. मागील आठवडय़ात ढगाळ हवामानामुळे उकाडय़ाला तोंड द्यावे लागणाऱ्या नाशिककरांना हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे गारठावे लागले आहे. निफाड येथे राहुरी कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रात शनिवारी ३.०१, तर नाशिकमध्ये ७.०४ अशी तापमानाची नोंद झाली होती. दोन दिवसांत तापमान बरेच खाली आल्याने त्याचा परिणाम द्राक्षबागांवर होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मण्यांना तडे पडणे, त्यांची गळ होणे, असे प्रकार थंडीमुळे होऊ शकतात. तापमानातील बदलाचा परिणाम आरोग्यावरही होत असून रुग्णालयांमधील गर्दीत वाढ झाली
आहे.   

मुंबईत १०.४
मुंबई/पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान सरासरीच्या खाली आले असून, मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण झाली आहे. तर मुंबईतही पाऱ्याने १०.४ अंशावर डुबकी मारल्याने दिवसभर गारठा जाणवत होता. येत्या चोवीस तासांत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.
उत्तरेकडील राज्ये थंडीने गारठली आहेत. हे थंड वारे दक्षिणेकडे वाहात असल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढत चालला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीच्या चार ते पाच अंशांनी तापमान कमी झाले असून, या ठिकाणी थंडीची लाट निर्माण झाली आहे. मुंबई शहरात रविवारी सकाळपर्यंत शहरात किमान तापमान एक अंशांने घटून १६.१ अंश सेल्सिअस तर उपनगरात १०.४ अंशांपर्यंत खाली आले. थंड वारे आणि आकाश मोकळे असल्याने थंडीचा जोर वाढला आहे. आणखी दोन दिवस असेच वातावरण राहील. त्यानंतर बुधवारपासून बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील तुलनेत कमी थंड असलेला वारे वाहू लागतील. त्यामुळे तापमान वाढेल, असे वेधशाळेने सांगितले.

निफाड २.०७
नाशिक जिल्ह्यात रविवारी निफाड येथे २.०७ पर्यंत पारा खाली घसरला. या हंगामातील हे जिल्ह्यातील सर्वात कमी तापमान असून नाशिक शहरातही ४.०७ इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. मागील आठवडय़ात ढगाळ हवामानामुळे उकाडय़ाला तोंड द्यावे लागणाऱ्या नाशिककरांना हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे गारठावे लागले आहे.

दिल्लीत पारा १.९ अंश
संपूर्ण उत्तर भारत थंडीने गारठला असून राजधानी दिल्लीत पारा १.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. थंडीची ही लाट आणखी दोन दिवस चालेल असा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे. थंडीच्या बळींमध्ये रविवारी आणखी २३ जणांची भर पडली असून आतापर्यंत बळींचा आकडा १६० वर पोहोचला आहे. उत्तर भारतात थंडीने कहर केला असून आणखी दोन दिवस तापमानात कोणताही बदल होणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फराबाद येथे तर पारा शून्याच्याही खाली घसरला असून राजधानी दिल्लीत १.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीचा हा यंदाचा नीचांक समजला जात आहे. राजधानीत सोमवारी धुक्याचे साम्राज्य असेल असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

हुडहुडी..!
पुणे ८.१
मालेगाव ७
अलिबाग १४.५
रत्नागिरी १३.४
सातारा ९.३
जळगाव ७.१
महाबळेश्वर १४.२
सांगली १४.५
सोलापूर १४.५
औरंगाबाद १०.१
परभणी ११.२
अकोला ११
अमरावती १२.२
बुलढाणा १३.२
गोंदिया ११.६
नागपूर १२.९