06 March 2021

News Flash

काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार का? सुशील कुमार शिंदे म्हणाले…

माझ्या दोन मुस्लिम अंगरक्षकांबरोबरही बाळासाहेबांच्या रात्री-बेरात्री गप्पा रंगायच्या ही आठवणही त्यांनी सांगितली.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आज पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

“बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक जायचे. बाळासाहेब ठाकरे यांनी साबीर शेख या मुस्लिम व्यक्तीला आमदार आणि मंत्री देखील केले. हे बाळासाहेब सर्व धर्मीय होते, याचं उत्तम उदाहरण आहे. हिंदुत्वाचा विचार करणारा, तसेच सर्व धर्माची भूमिका मांडणारा आणि महाराष्ट्र वाचवणारा थोर नेता म्हणजे बाळासाहेब” असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. माझ्या दोन मुस्लिम अंगरक्षकांबरोबरही बाळासाहेबांच्या रात्री-बेरात्री गप्पा रंगायच्या ही आठवणही त्यांनी सांगितली.

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी आपल्या नावाची चर्चा होत आहे. तुम्हाला संधी मिळाली तर काँग्रेसचे नेतृत्व करणार का? या प्रश्नावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, “खरं म्हटलं तर मला काही माहिती नाही. आता काही सांगता येत नाही. ‘बाजारात तुरी आणि कशाला मारी’ या म्हणीचे त्यांनी उदहारण दिले.”

औरंगाबादच्या नामांतरासंदर्भातही सुशीलकुमार शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ‘हा सरकार मधील प्रश्न आहे. मी सरकार बाहेरील व्यक्ती आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 6:25 pm

Web Title: congress senior leader from solapur sushil kumar shinde on congress chief post said dmp 82
Next Stories
1 सरळसेवा भरतीसाठी राज्य सरकारकडून चार कंपन्यांची निवड
2 या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल, तर शिवसेनाच हवी -संभाजी भिडे
3 फडणवीस-पाटील यांनी भाजपा प्रवेशासाठी दिली होती १०० कोटींची ऑफर; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट
Just Now!
X