मिरजेतील आझाद शिक्षण संस्थेला २८ लाखांचे कर्ज देताना नियम डावलून जिल्हा मध्यवर्ती बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन बँकेचे अध्यक्ष, माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्यासह ११ जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात न्यायालयीन आदेशान्वये गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आझाद शिक्षण संस्था मिरजेचे अध्यक्ष इलियास युसूफ नायकवडी ( वय ७०), इकलास इलियास नायकवडी (४४), इम्रान इलियास नायकवडी (४२), इकराम इलियास नायकवडी (४१), इमाम इलियास नायकवडी (४९), रूबेदा अस्लम गोलंदाज (४९, सर्व रा. मिरज), तत्कालीन अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव भाऊसाहेब िशदे (रा. आष्टा), जिल्हा मध्यवर्ती बँकेचे इतर सहकारी संस्थाचे उपव्यवस्थापक, कार्यकारी संचालक, मार्केट यार्ड शाखा मिरजेचे शाखाधिकारी, तत्कालीन संचालक इद्रिस इलियास नायकवडी (५५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  सामाजिक कार्यकत्रे महेशकुमार महादेव कांबळे (३३, रा. पंचशीलनगर, मिरज) यांनी याबाबत न्यायालयात फिर्याद दिली होती.
मिरजेतील आझाद शिक्षण संस्थेने मार्केट यार्ड शाखा मिरज येथे कर्जासाठी प्रकरण दाखल केले होते. त्यासाठी मालकीची नसलेली जागा तारण दिली होती. बँकेच्या तत्कालीन अध्यक्षासह इतरांनी याबाबत कोणताही आक्षेप न घेता आझाद शिक्षण संस्थेसाठी कर्ज मंजूर केले. चुकीच्या पद्धतीने कर्ज मंजूर करून देऊन बँकेची २८ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच नुकसान केले. २००१ ते ४ मार्च २०१३ या काळात हा प्रकार घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार