राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध नियोजीत परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता इन्सि्टट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडिया (आयसीएआय) सीए फायनल आणि इंटरमिजीएटच्या २१ मे पासून सुरू होणाऱ्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं आयसीएआयकडून ट्विटद्वारे सांगण्यात आलं आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव व विद्यार्थ्यांच्या सुरेक्षाचा विचार करता, सीए फायनल आणि इंटरमिजीएटची २१ आणि २२ मे पासून सुरू होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाठी २५ दिवसांचा वेळ मिळेल, अशा पद्धतीने परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात येईल, असं आयसीएआयच्या ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?

नुकतच एमबीबीएस प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या ज्या परीक्षा करोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

‘एमबीबीएस’ परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल, असं त्यांना सांगितलेलं आहे.