18 September 2020

News Flash

धुळ्यात आज धम्म मेळावा

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या जिल्हा शाखेतर्फे २६ जानेवारी रोजी येथे आयोजित धम्म मेळाव्यात उपासक, उपासिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

| January 26, 2015 01:21 am

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या जिल्हा शाखेतर्फे २६ जानेवारी रोजी येथे आयोजित धम्म मेळाव्यात उपासक, उपासिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षांवासातील उपसथव्रत, धम्म प्रवचन आयोजित करून धम्म प्रचार व प्रसाराचे कार्य करणाऱ्या धम्म उपासक उपासिकांचा सन्मान होणार आहे. सकाळी ११ वाजता साक्री रस्त्यावरील कर्मचारी कल्याण भवनात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास डी. एन. पिसोळकर, आर. आर. कसबे, भन्ते गुणरत्नजी, उमेश शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सर्वानी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2015 1:21 am

Web Title: dhamma conference in dhule
Next Stories
1 गोवा एक्स्प्रेसमधील प्रवाशांची तपासणी
2 नाशिकमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस
3 ‘युतीत १५ दिवसांमध्येच संघर्ष’
Just Now!
X