News Flash

डॉक्टरांनी गुणवत्तापूर्वक सेवा देणे गरजेचे -डॉ. विवेक रेडकर

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात डॉक्टर फॅटर्निटी क्लबचे भवन होणे गरजेचे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात डॉक्टर फॅटर्निटी क्लबचे भवन होणे गरजेचे आहे. तसे भवन झाल्यास सिंधुकॉनसारखी परिषद दोन महिन्यातून एकदा आयोजित करून विविध विषयावर चर्चा होऊ शकते असे डॉ. विवेक रेडकर म्हणाले. वैद्यकीय क्षेत्रात अनेक नवीन बदल होत आहेत. त्यामुळे जनतेच्या डॉक्टरांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. डॉक्टरांनी लोकांना गुणवत्तापूर्वक सेवा दिली पाहिजे असे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विवेक रेडकर यांनी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबच्या सिंधुकॉन २०१६च्या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले. यावेळी परिषदेला कोकण, गोवा, कर्नाटकातून सुमारे ६०० डॉक्टरांनी उपस्थिती दर्शविली होती.

इंडियन असोशिएशन ऑफ फीजीसीहन आणि डॉक्टर्स फॅटर्निटी  क्लब सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय सिंधुकॉन २०१६ च्या वैद्यकीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. विवेक रेडकर, सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे, सावंतवाडी मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ, डॉक्टर फॅटर्निटी क्लबचे डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. दर्शेश पेठे, सिंधुकॉनचे संयोजक सचिव डॉ. शंतनु तेंडुलकर आदी उपस्थित होते.

या परिषद उद्घाटनप्रसंगी कारगील लढय़ात सहभागी होऊन शौर्य गाजविणारे बाळकृष्ण राऊळ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या शौर्यास सभागृहाने उभे राहून मानवंदना दिली.

यावेळी डॉ. संजीव धारिया, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. संजीव गोखले, मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. शीतल लेंगडे, रक्तविकार तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण पडते, डॉ. अतुल पावसकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. श्रीराम कुलकर्णी यांनी स्मार्ट फोन व मेडिसिनबाबत खास मार्गदर्शन केले.

सिंधुकॉनच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. दर्पेश पेठे, डॉ. अमृत गावडे, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. राजशेखर कार्येकर डॉ. मिलिंद खानोलकर, डॉ. कश्यप देशपांडे, डॉ. अभिजीत वझे, डॉ. संजय दळवी, डॉ. नितीन सावंत, डॉ. संजय सावळ, डॉ. नंदादीप चोडणकर, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. रेवणसिद्ध खटावकर, डॉ. चंद्रकांत मकदूम, डॉ. कादंबरी पावसकर, डॉ. संदीप सावंत, डॉ. सतीश सावंत, डॉ. उमेश मसुरकर, डॉ. प्रसाद नार्वेकर, डॉ. मिलिंद लोकेगावकर तसेच आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

वैद्यकीय क्षेत्रात अ‍ॅलोपॅथी, होमीओपॅथी, आयुर्वेद अशा शाखा आहेत. या शाखामधील डॉक्टर लोकांना सेवा देत आहेत. या क्षेत्रात अनेक ज्येष्ठ व तज्ज्ञ डॉक्टर जिल्ह्य़ात आहेत. त्यांचेदेखील नवीन पदार्पण करणाऱ्यांनी मार्गदर्शन घेतले पाहिजे असे डॉ. रेडकर म्हणाले. डॉक्टरांच्या या परिषदेमुळे नवनवीन विषयावर चर्चादेखील झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 2:21 am

Web Title: doctors need to give good service quality says dr vivek redkar
Next Stories
1 लाचखोरीच्या प्रकरणात महसूल विभाग राज्यात अव्वल
2 मांडवा -किहिम फेस्टीवलचे आयोजन
3 ‘भारतमाता की जय’ घोषणा लादणे अयोग्य
Just Now!
X