प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा प्रेम, दया, शांती, त्यागाचा संदेश सर्वांनी आचरणात आणून मानवतेच्या कल्याणाचा विचार पुढे घेऊन जाऊया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  ‘ईद-ए-मिलाद’ निमित्ताने शुभेच्छा देताना केले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला ‘ईद-ए-मिलाद’ निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होत असलेला ‘ईद-ए-मिलाद’चा सण हा समाजात प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा एकता, समता, बंधुता, सौहार्दाचा संदेश घेऊन जाईल. मानवतेच्या कल्याणासाठी सर्वांना प्रेरीत करील असे ईद-ए-मिलाद’निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ईद-ए-मिलाद’चा सण साजरा करीत असताना आपण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे, सोशल डिस्टन्सिंगंचे, स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.