News Flash

आठ वर्षांच्या मुलाचा साधूकडून खून

वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथे एका साधूने आठ वर्षांच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केला.

वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथे एका साधूने आठ वर्षांच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून केला. त्यामुळे चिडलेल्या जमावाने साधूवर हल्ला केल्याने त्याचाही मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. गुप्तधनापोटी मुलाला मारले असावे, असा गावकऱ्यांचा संशय आहे. मृत मुलाचे नाव महेश उगले, असे आहे. या घटनेनंतर औरंगाबाद ग्रामीण विभागाचे पोलीस निरीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपविभागीय अधिकारी हर्ष पोतदार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी घटनास्थळाला भेट दिली. मात्र मुलाचा खून कोणत्या कारणाने झाला, याबाबत साशंकता असल्याचे सांगितले. या घटनेमुळे वैजापूर परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 2:27 am

Web Title: eight years old child murder in bijapur
Next Stories
1 मिरजमध्ये ७३ जणांना वास्तुशांतीच्या जेवणातून विषबाधा
2 मंत्री राठोड यांच्या मतदारसंघात शेतकऱ्याची आत्महत्या
3 शिवप्रतापदिन उत्साहात साजरा
Just Now!
X