मटका किंग रतन खत्री यांचं मुंबईत राहत्या घरी निधन झाले आहे. शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते ८८ वर्षांचे होते. रतन खत्री गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.
मुंबई सेंट्रलमधील नवजीवन सोसायटीत रतन खत्री आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. ६० च्या दशकात खत्री यांनी कल्याणमधून मटक्याच्या धंद्याला सुरूवात केली होती. सुरूवातीला खत्री भगत यांच्या धंद्यात मॅनेजर म्हणून रुजू झाले होते. १९६४ मध्ये खत्री यांनी भगतपासून वेगळे होऊन स्वत: चा रतन मटका धंदा सुरू केला. मटका किंवा एका भांड्यात चिट्सवरून चिठ्ठी काढणे इतके प्रसिद्ध झाले की, त्या काळात जुगाराची उलाढाल दररोज १ कोटी रुपयांच्या घरात असायची.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2020 3:47 pm