07 June 2020

News Flash

हिंगोलीच्या दुष्काळाची आता परभणीत बैठक!

भाजप सरकारकडून शेतकऱ्यांच्या मोठय़ा अपेक्षा असताना महसूल खात्याच्या गलथान कारभारामुळे दुष्काळात जिल्ह्य़ाची परवड होत आहे.

| November 23, 2014 01:53 am

दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मराठवाडय़ात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा सध्या पाहणी दौरा सुरू असला, तरी या दौऱ्यात मात्र िहगोलीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याची भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. याचे कारण जिल्ह्याच्या दुष्काळावर त्यांनी परभणीत उद्या (रविवार) आयोजित केलेली आढावा बैठक. नाथाभाऊंना िहगोलीचे वावडे आहे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.
आकारमानाने लहान असलेल्या िहगोली जिल्ह्य़ाकडे सुरुवातीपासून सर्वच राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. या पूर्वीही जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर थेट मुंबईत बठका घेतल्या.
भाजप सरकारकडून शेतकऱ्यांच्या मोठय़ा अपेक्षा असताना महसूल खात्याच्या गलथान कारभारामुळे दुष्काळात जिल्ह्य़ाची परवड होत आहे. मंत्र्यांना िहगोलीत प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेण्यास वेळ नाही का, असा सवाल शेतकऱ्यांतून विचारला जात आहे. मंत्री खडसे दुष्काळाच्या पाहणीसाठी मराठावाडय़ात अन्य जिल्ह्यांचा दौरा करीत असले, तरी िहगोलीत न येताच परभणीत ते आढावा घेणार आहेत.
िहगोली जिल्ह्यात जेमतेम ५३ टक्के पावसाची नोंद झाली. अवेळी व अपुरा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप पीक गेले. नापिकीच्या नराश्यातून १० महिन्यांत २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. समाधानकारक पाऊस न पडल्याने रब्बी पिकांची शक्यताही मावळली आहे. सर्वेक्षणानंतर जिल्ह्यातील ७०७ गावांची पीक पैसेवारी ५०पेक्षा कमी असल्याची सरकारदरबारी नोंद झाली आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांनी केली. जनावरांसाठी तात्काळ चाराडेपो सुरू करण्याची मागणी आहे. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या अहवालात २ लाख ३१ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याचे म्हटले. परंतु जिल्ह्यात ३ लाख ६३ हजार ८७४ जनावरे आहेत. जनावरांना प्रतिदिन लागणाऱ्या चाऱ्याचे प्रमाण लक्षात घेता किमान ७ लाख २० हजार ६०४ मेट्रिक टन चाऱ्याची गरज आहे. त्यामुळे अहवालातून पशुसंवर्धन विभागाची बनवाबनवी उघड झाली.
एका पिकाचे सहा रुपये!
जिल्ह्यातील ५५ हजार ४९३ शेतकऱ्यांनी खरीप पीकविम्याची रक्कम भरली. ऑक्टोबरअखेर पीकविमा हप्त्यापोटी २ कोटी ५७ लाख ६० हजार रुपये, तर रब्बी पीकविम्याच्या हप्त्यापोटी कापलेल्या रकमेपकी विमा कंपनीकडे जमा असलेली रक्कम ४९ हजार ५२२ रुपये आहे. पीकविम्याच्या लाभाचा विचार करता गतवर्षीच्या पीकविम्यासंबंधीचा शेतकऱ्यांना वाईट अनुभव येत आहे. कळमनुरीतील शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम बँकेतून उचलून निषेध करीत पीकविम्याचा मिळालेला निधी मुख्यमंत्री निधीला सुपूर्द केला. धम्मपाल पाईकराव, सुधाकर भारती, अनिल बुस्रे, मारोती पवार, अनिल भोरे, शिवाजी पाटील, कैलास पारवे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उडीद पिकासाठी हेक्टरी केवळ १७६ रुपये, ज्वारी पिकासाठी ६ रुपये भरपाईची रक्कम जमा झाली. या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन ही रक्कम काढून मुख्यमंत्री निधीत जमा करीत विमा कंपनी व सरकारचा निषेध केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2014 1:53 am

Web Title: femine meeting now in parbhani
टॅग Parbhani
Next Stories
1 कराड, पाटणला भूकंपाचे झटके
2 ..तर मंत्र्यांना सभागृहात येऊ देणार नाही
3 चंद्रपूर, बारामती, नंदूरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयांना नकार
Just Now!
X