News Flash

रडणाऱ्या मुलाला जवळ घेतले नाही, पतीने पत्नीचे दात पाडले

सुवर्णाने मुलाला जवळ न घेतल्याने माणिकला राग अनावर झाला. त्या रागातच त्याने पत्नीला दगड फेकून मारला.

(संग्रहित छायाचित्र)

रात्री झोपेतून उठलेल्या मुलाला पत्नीने घेतले नाही. यामुळे राग अनावर झाल्याने पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचे दात पडले. या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. माणिक गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडली.

ही घटना २२ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. गायकवाड दाम्प्त्याचा लहान मुलगा रात्री अचानक उठला आणि रडायला लागला. त्यावेळी पती माणिकने पत्नी सुवर्णाला मुलाला जवळ घेण्यास सांगितले. परंतु, सुवर्णाने मुलाला जवळ न घेतल्याने माणिकला राग अनावर झाला. त्या रागातच त्याने पत्नीला दगड फेकून मारला. त्यात सुवर्णाचा दात पडला.

दरम्यान, शेजाऱ्यांनी पती-पत्नीचे भांडण सोडवले. जखमी अवस्थेत सुवर्णाने आपल्या भावाला फोन केला. बार्शी शहरातील एका खासगी रूग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. सुवर्णाने घडल्या प्रकाराची तक्रार पोलिसांत दिली. त्यावरुन बार्शी शहर पोलिसांत पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 3:42 pm

Web Title: for not taken crying child husband beaten wife barshi solapur
Next Stories
1 कोल्हापूरमध्ये चर्चजवळ दगडफेक
2 दाऊदच्या गँगस्टरला 20 वर्षांनंतर मुंब्रा येथून अटक
3 5 जानेवारीला सरकारी अधिकारी संपावर
Just Now!
X