News Flash

भूखंड घोटाळ्याप्रकरणी परभणीच्या माजी खासदाराला अटक

सोमवारी पहाटे पोलिसांनी गणेश दुधगावकर यांना देखील अटक केली असून दुधगावकर हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.

संग्रहित छायाचित्र

भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार गणेश दुधगावकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. परभणीतील नानलपेठ पोलिसांनी ही कारवाई केली असून कर्मचारी गृहनिर्माण संस्थेचा भूखंड लाटल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण सोसायटीच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी गणेश दुधगावकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तीन दिवसांपूर्वी एका तलाठीला देखील अटक करण्यात आली होती. सोमवारी पहाटे पोलिसांनी गणेश दुधगावकर यांना देखील अटक केली असून दुधगावकर हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.

गणेश दुधगावकर हे काँग्रेसमधून शिवसेनेत गेले. शिवसेनेच्या तिकिटावर ते खासदारही झाले. मात्र, चार वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 3:07 pm

Web Title: former mp ganesh dudhgaonkar arrested in land scam case
Next Stories
1 नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा कहर, एकाचा मृत्यू
2 पुस्तक वाचून धंदा करता येत नाही: राज ठाकरे
3 महिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या
Just Now!
X