News Flash

नांदेड : पिस्तुलाचा धाक दाखवून फळ विक्रेत्याचे ३० लाख रुपये लंपास

या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

फळ विक्रेत्याला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याजवळची ३०  लाख रुपये असलेली बॅग लुटल्याची घटना माळटेकडी परिसरात सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील माळटेकडी परिसरात फळ विक्रेत्यांची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत व्यापारी मो.साजिद मो.हसन यांचं फळाचं दुकान आहे. शनिवारी व रविवारी झालेल्या व्यापाराचे ३० लाख रूपये घेऊन बँकेत भरण्यासाठी आपला सहकारी स.मुजफिर स.गुलाब याच्यासोबत निघाले असता त्यांच्या मागावर असलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या दुचाकीला धक्का दिला.

यावेळी व्यापारी व त्यांचा सहकारी हे दुचाकीवरून खाली पडले. दुसर्‍या दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्यावर पिस्तुल रोखले व त्यांच्याकडील ३० लाख रूपये रक्कम असलेली बॅग लंपास केली. तसेच त्या आरोपींनी या व्यापार्‍यांना मारहाणही केली. या घटनेची माहिती समजताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फसके यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी विमानतळ पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 9:25 pm

Web Title: fruit dealer looted for 30 lacks attackers show him pistol in nanded scj 81
Next Stories
1 नाशिकमध्ये महिलेने स्वतःला पोलीस ठाण्यासमोरच पेटवून घेतलं
2 स्त्री पंतप्रधान झाली, राष्ट्रपती झाली पण सुरक्षित नाही झाली- पंकजा मुंडे
3 रत्नागिरीत टुरिस्ट व्हिसावर आलेल्या बांगलादेशींंविरोधात कारवाई करा, भाजपाची मागणी
Just Now!
X