माथेरानच्या राणीला आता नवा साज मिळणार आहे. माथेरानच्या मिन्रिटेनच्या ताफ्यात नवीन इंजिन आणि डबे दाखल होणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंभर वर्षांपूर्वी इंग्लंडमधून आणलेल्या वाफेच्या इंजिनाला रेल्वेने डिझेल इंजिनमधे रूपांतरित केले आहे.   १९०७ साली माथेरानची रेल्वे सुरू झाली. त्यावेळी ती वाफेच्या इंजिनावर धावत असे. यासाठी इंग्लंडमधून खास बनावटीची रेल्वे इंजिन मागवण्यात आली होती. यातील एनडीएम-७९४ हे वाफेवर चालणारे इंजिन आता रेल्वे अभियंत्यानी डिझेल इंजिनमध्ये रूपांतरित केल आहे.
सोमवारी या इंजिनची नेरळ ते माथेरान अशी चाचणी घेतली जाणार आहे. नवीन बनावटीच्या डब्यांची चाचणीदेखील घेतली जाणार आहे.
  माथेरानची राणी पूर्वी याच स्टीम इंजिनवर चालत होती, मात्र कालांतराने हे वाफेचे इंजिन आग ओकू लागले होते. यामुळे रेल्वे रुळा शेजारील जंगलांना आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन वन विभागाने या इंजिनच्या वापरावर र्निबध आणले होते. त्यामुळे एनडीएम-७९४ हे इंजिन कालबाह्य़ झाले होते. मात्र याच इंजिनला नवा साज देण्याची किमया रेल्वेच्या अभियंत्यानी करून दाखवली आहे. इंजिनच्या बाह्य़ स्वरूपात फारसा कुठलाही बदल न करता हे इंजिन डिझेल इंजिनात रूपांतरित करण्यात आले आहे.
 आता या इंजिनला प्रवासी सेवेसाठी दाखल करण्यापूर्वी तीन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. यापैकी पहिली चाचणी शुक्रवारी ७ रोजी घेण्यात आली.
तीन नवीन डब्यांसह इंजिनाने नेरळ ते जुम्मापट्टी स्थानकापर्यंतचे अंतर पार केले. सोमवारी १० तारखेला या इंजिनाची पुढची चाचणी केली. ेरळ ते माथेरान हे अंतर या  रूपांतरित इंजिनाच्या साह्य़ाने पार केले जाणार आहे. हा प्रवास इंजिनाने अडथळ्याविन्या पूर्ण केला तर लवकर नव्या रूपातील, नव्या ढंगातील माथेरानची राणी हिरवी वाट काढत धावताना दिसणार आहे.