News Flash

वृध्द सुरक्षा रक्षकाकडून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

एका सात वर्षांच्या मुलीला त्याने खाऊचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी बोलावले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

(संग्रहित छायाचित्र)

शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ६५ वर्षांच्या वयोवध्द सुरक्षा रक्षकाने चिमुकल्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उजेडात आली. या घटनेची वाच्यता होताच परिसरातील नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला. परंतु नंतर नागरिकांच्या तावडीतून सुटका करून घेत त्याने पलायन केले. त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

धनसिंग जाधव (रा. सोलापूर) असे या गुन्ह्य़ातील आरोपीचे नाव आहे. तो खासगी सुरक्षा रक्षकाची नोकरी करतो. एका सात वर्षांच्या मुलीला त्याने खाऊचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी बोलावले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यासंदर्भात संशय आल्याने काही नागरिकांनी नजर ठेवून त्याला पकडले.

तेव्हा पीडित मुलीनेही आपल्यावर गुदरलेला प्रसंग सर्वासमोर कथन केला. त्यामुळे संपातलेल्या नागरिकांनी धनसिंग जाधव यास जागेवरच बेदम चोप दिला. तेव्हा नागरिकांच्या तावडीतून स्वत:ची कशीबशी सुटका करून त्याने धूम ठोकली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी धनसिंग जाधव याचा शोध घेतला जात असल्याचे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 1:59 am

Web Title: girl sexually assaulted by an elderly security guard abn 97
Next Stories
1 दारूसाठी पैसे न दिल्याने सांगोल्यात प्राणघातक हल्ला
2 वेतन न मिळाल्यामुळे कामगाराची आत्महत्या
3 निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांच्या सहभागाने सकारात्मक बदल – डॉ. नीलम गोऱ्हे
Just Now!
X