News Flash

हे सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपात असते – नारायण राणे

"पाटलांच्या इस्लामपुरात जाऊन भांडाफोड करणार"

महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपात असते, असा दावा भाजपा नेते नारायण राणे यांनी केला आहे. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना राणे म्हणाले, “आज महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती. पाटलांच्या इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार आहे.”

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्राचारार्थ बोलताना जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. राणे सातत्याने सरकारवर टीका करत असल्याबाबत पाटील यांना विचारण्यात आले यावर त्यांनी “गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं” अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवली होती. महाविकास आघाडी सरकार पडणार असं सांगत भाजपा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. मात्र, आम्ही तर एक वर्षही पूर्ण केलं आहे. त्यामुळे राणेंच्या टीकेला गंभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 4:53 pm

Web Title: had this govt not been formed jayant patil would have been in bjp says narayan rane aau 85
Next Stories
1 भजन-किर्तनातून नव्हे तर अजान ऐकण्यातून शिवसेनेला मनःशांती मिळतेय – तुषार भोसले
2 फडणवीसांच्या त्रुटीनेच मराठा आरक्षणाला स्थगिती; राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप
3 आत्महत्येआधी डॉक्टर शीतल आमटेंची सूचक पोस्ट
Just Now!
X