सरकारी व्यवस्थांना वाईट लेखून त्यांना मोडित काढण्याची मानसिकता निर्माण केली जात आहे. व्यवस्थेला वाईट ठरविले की ती पुसून तेथे खासगीकरण करता येते. अशा अवस्थेत जातीय व वर्ग संघर्ष अधिक तीव्र केले जात आहेत. असंघटित कामगारांपुढे आणि त्यांचा लढा उभारणाऱ्यांपुढे वैचारिक स्पष्टता नसेल तर प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन समाजवादी कार्यकर्ते रंगा राचुरे यांनी केले. प्रवीण वाघ स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास मानव कांबळे, सुभाष लोमटे, विजय दिवाण, अॅड. सुभाष सावंगीकर आदी उपस्थित होते.
या वर्षी प्रवीण वाघ कार्यकर्ता पुरस्कार प्रवीण सरकटे यांना देण्यात आला. या वेळी ‘असंघटित क्षेत्रातील कार्यकर्त्यांसमोरील आव्हाने’ या विषयावर रंगा राचुरे, प्रा. विजय दिवाण यांची भाषणे झाली. राचुरे म्हणाले की, अनेक बाबतीत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. अगदी पुरोगामी कार्यकत्रे पुरोगामीपणे वागतात का, येथपासून ते लोक बडेजावपणा कसे भुलले आहेत येथपर्यंत अनेक बाबी तपासल्या पाहिजेत. सुभाष लोमटेंसारखा एखादा कार्यकर्ता निवडणुकीत उभे राहिल्यानंतर त्याला संघटनेतील कार्यकत्रेही पािठबा देत नाहीत. कारण नेत्यांच्या बडेजावपणाला सर्वजण भुललेले असतात. त्यात कार्यकर्ताही आला. विचारांच्या पातळीवरील खरेपणाचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे सांगत राचुरे म्हणाले की, अलीकडे समाजवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या घरासमोरदेखील फेरीवाल्यांनी आत येऊ नयेची पाटी लावली आहे. जाता- जाता चांगला कार्यकर्ता देवळात दर्शन घेऊन येतो. समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. ते दूर करण्यासाठी उभारण्यात आलेली प्रशिक्षणाची पद्धतही आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. वैचारिक स्पष्टता नसणे हे असंघटित क्षेत्रासमोरचे आव्हान आहे. आíथक प्रश्नांची सोडवणूक करताना अंतर्गत संघर्षांकडे डोळसपणे पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी बोलताना मानव कांबळे म्हणाले की, कार्यकर्त्यांमध्ये विचारशक्ती निर्माण करण्यात कमी पडतो आहोत. नुकतेच एका कार्यकर्त्यांने ओवीसीचे भाषण कसे आक्रमक असते हे सांगितले. तेव्हा प्रवीण तोगडिया आणि ओवीसी यांची भाषा एकच आहे, हे समजून सांगण्यात चळवळ कमी पडते आहे. पण ज्या ध्येयाने प्रवीण वाघ यांनी असंघटितांची चळवळ पुढे नेली ती त्याच विचारांनी पुढे न्यायची असेल तर ध्येयाने काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. या वेळी विजय दिवाण यांचेही भाषण झाले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2014 रोजी प्रकाशित
वैचारिक स्पष्टता नसणे हाच पेच -रंगा राचुरे
असंघटित कामगारांपुढे आणि त्यांचा लढा उभारणाऱ्यांपुढे वैचारिक स्पष्टता नसेल तर प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन समाजवादी कार्यकर्ते रंगा राचुरे यांनी केले.
First published on: 15-09-2014 at 01:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ideological frankness complication ranga rachure