जेवणाच्या वेळी पोळी भाजी ठिक आहे. पण सकाळचा ब्रेकफास्ट आणि संध्याकाळी भूक लागल्यावर मुलांना आणि घरातील इतर मंडळींनाही काहीतरी वेगळे खायला लागतेच. अशावेळी पोटभरीचे आणि तरीही आरोग्यदायी काय खायला द्यायचे असा प्रश्न तमाम महिलावर्गासमोर असतो. मग घरात उपलब्ध असलेल्या जिन्नसातून छान काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी साधं उदाहरण म्हणून फोडणीचा भात किंवा फोडणीची पोळीच घ्या ना… एकेकाळी शिळं अन्न खाण्यायोग्य करण्याचा प्रयत्न या दृष्टीनं याकडे बघितलं जायचं. परंतु आता, फोडणीचा भात हा रेस्टॉरंटमधली डिश झाली आहे.

त्यामुळे अशाच नावीन्याच्या प्रयत्नातून एक आगळीवेगळी पाककृती साकारत असते. तुम्हीदेखील नक्कीच बनवत असाल अशी एखादी पाककृती. तर ही पाककृती आपल्यापुरती मर्यादीत न ठेवता ती लोकसत्ता डॉट कॉमच्या माध्यमातून जगाला कळू द्या. ही तुमची पाककृती केवळ सगळ्यांपर्यंत पोचेल इतकंच नाही, तर तुमच्या या खास पाककृतीसाठी आकर्षक बक्षीस जिंकण्याचीही संधी तुम्हाला मिळणार आहे.

‘लोकसत्ता ऑनलाइन’ने एका खास स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये तुम्ही आपल्या रेसिपी पाठवू शकता. त्यामुळे तुम्ही अगदी सहज म्हणून ट्राय केलेली ही रेसिपी तुम्हाला बक्षीस तर मिळवून देईलच, पण ती रेसिपी अनेकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही मदत करेल. या स्पर्धेत जिंकलेल्या भाग्यवान विजेत्याला कुटुंबासह गोव्यामध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. याबरोबरच आठवड्याला आणखीही खास बक्षीसे मिळणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या माध्यमातून तुम्ही तुमच्या भागात प्रसिद्ध असणारी, परंतु देशातल्या अन्य लोकांना अपरिचित असलेली मोदकाची आणि इतरही पाककृतीही जगभरात पोहोचवू शकणार आहात. प्रेस्टिज सहप्रायोजक असलेल्या या पाककला स्पर्धेचे ग्रेटर बँक गोल्ड लोन हे बँकिंग पार्टनर आहेत. चला तर मग या खास पाककला स्पर्धेत सहभागी व्हा आणि तुमच्यातल्या पाककलेच्या कौशल्याला वाव द्या! सहभागासाठी भेट द्या: indianexpress-loksatta.go-vip.net/paakkala