News Flash

औरंगाबादमध्ये कचराकुंडीत स्फोट होऊन महिलेचा मृत्यू

औरंगाबाद शहरात गुरूवारी कचऱ्यातील स्फोटक पदार्थांचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. येथील निसारवाडी गावानजीक असणाऱ्या व्होकार्ड कंपनीच्या मागील बाजूस नंदाबाई कुडुबा भालेराव (४०) ही

| October 16, 2014 02:04 am

औरंगाबाद शहरात गुरूवारी कचऱ्यातील स्फोटक पदार्थांचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. येथील निसारवाडी गावानजीक असणाऱ्या व्होकार्ड कंपनीच्या मागील बाजूस नंदाबाई कुडुबा भालेराव (४०) ही महिला कचराकुंडीतला कचरा गोळा करत असताना हा प्रकार घडला. हा स्फोट इतका जोरदार होता की, संबंधित महिला स्फोट झाल्यानंतर काही अंतरावर फेकली गेली. मात्र, हा स्फोट नक्की कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनास्थळी पोलीस याप्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.

 

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 2:04 am

Web Title: in aurangabad lady died due to blast
टॅग : Aurangabad,Blast,Loksatta
Next Stories
1 मराठवाडय़ात ६५ ते ७० टक्के
2 लातूरमध्ये पाचपर्यंत ६०.७२ टक्के
3 बीड जिल्ह्य़ात सरासरी ६५ ते ७० टक्के
Just Now!
X