03 December 2020

News Flash

दिलासादायक, महाराष्ट्रात आज १४ हजार २३८ करोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज

१०,२५९ नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रात आज १०,२५९ नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पण त्याचवेळी बाधा होणाऱ्यांपेक्षा डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात आज एकूण १४ हजार २३८ रुग्ण करोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला. त्याचवेळी आज २५० करोना रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत एकूण करोनाची बाधा झालेल्यांची संख्या १५,८६, ३२१ आहे. त्यात १३,३८, ६०६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या राज्यात १ लाख ८५ हजार २७० करोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ४१,९६५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी महाराष्ट्रात ११ हजार ४४७ करोना रुग्ण आढळले होते, तर १३ हजार ८८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. काल दिवसभरात ३०६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 9:51 pm

Web Title: in maharashtra discharge patient more than new covid infections dmp 82
Next Stories
1 करोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढवा, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
2 महाराष्ट्रात दसऱ्याच्या मुहूर्ताला व्यायामशाळा उघडणार
3 पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार सोलापूरला
Just Now!
X