राज्यात दिवसभरात ३,२१८ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर २,११० रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९४.६४ टक्के झालं आहे. राज्यात सध्या ५३,१३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात आज ३,२१८ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर आज नवीन २,११० करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तसेच एकूण १८,३४,९३५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ५३,१३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.६४ टक्के झाले आहे. राज्यात आजवर ४९,६३१ करोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १२८ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८४ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९६ हजार ८५१ वर पोहचली असून यांपैकी ९३ हजार ५५९ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६४७ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.