News Flash

बीडच्या दांपत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

मुलगी बाल्कनीत उभी राहून रडत असल्याने घटना उघडकीस

Photo: Social Media

अमेरिकेत एका भारतीय दांपत्याचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मूळचे बीडच्या अंबाजोगाईमधील असणाऱ्या या दांपत्याची मुलगी बाल्कनीत एकटी उभी राहून रडत असताना शेजाऱ्यांनी पाहिलं असता ही घटना उघडकीस आली. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिल आहे. अमेरिकेच्या काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्यू जर्सीमधील नॉर्थ अर्लिंग्टन येथील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असणाऱ्या दांपत्याचा चाकूने वार झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

बालाजी भारत रुद्रवार (३२) आणि आरती बालाजी रुद्रवार (३०) अशी या मृत पती-पत्नीची नावं आहेत. अमेरिकेतील मीडियाच्या वृत्तानुसार, भारत यांनी आरती यांच्यावर लिव्हिंग रुममध्ये चाकूने हल्ला केला. आरती यांनी हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही.

बालाजी यांचे वडील भारत रुद्रवार यांनी पीटीआयशी बोलताना दिलेल्या वृत्तानुसार, “माझी नात बाल्कनीत एकटीच रडत असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घरात प्रवेश करुन पाहिलं असता मृतदेह आढळले”. वैद्यकीय तपासणीत चाकूने भोसकलं असल्याचं समोर आलं असल्याचं रिपोर्टमध्ये आहे.

“स्थानिक पोलिसांनी नंतर मला घटनेबद्दल माहिती दिली. मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांनी मला शवविच्छेदन अहवालातील माहिती देऊ असं सांगितलं आहे,” असं भारत रुद्रवार यांनी सांगितलं आहे. “माझी सून सात महिन्यांची गर्भवती होती. आम्ही त्यांच्या घरी गेलो होता. पुन्हा एकदा अमेरिकेला जाऊन त्यांना भेटण्याबद्दल विचार सुरु होता,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

यामागे काही कटकारस्थान आहे असं वाटतं का विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “यामागे काय हेतू असावा याची मला कल्पना नाही. पण ते एक आनंदी कुटुंब होतं. त्यांचे शेजारीही चांगले होते”. अमेरिकन प्रशासनाने मृतदेह भारतात येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागलीत असं कळवलं असल्याची माहिती त्यांनी दिली.

आयटी कंपनीत कामाला असणारे बालाजी रुद्रवार मूळचे बीडच्या अंबाजोगाईमधील आहेत. कामाच्या निमित्ताने ऑगस्ट २०१५ मध्ये ते पत्नीसोबत अमेरिकेत स्थायिक झाले होते. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांचं लग्न झालं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 9:47 am

Web Title: indian techie from beed and pregnant wife found dead in us sgy 87
Next Stories
1 “सर्वच परीक्षा पुढे ढकला”, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
2 ठाकरे सरकार आणि केंद्रातील वादादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान; म्हणाले…
3 आमच्या लसीकरणाचं काय?
Just Now!
X